शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

यंदा जिल्ह्याच्या विकासासाठी २५५ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:30 AM

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाचे ८० कोटी रुपये असून, ही रक्कम लवकरच राज्य शासन देणार आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक ...

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाचे ८० कोटी रुपये असून, ही रक्कम लवकरच राज्य शासन देणार आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १६०.४५ कोटी रुपये सन २०२०-२१ या वर्षात खर्च करण्यात आले आहेत. मागील वर्षी १०० टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्ह्यात १०.९३ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. पुढे बोलताना मंत्री मलिक यांनी, अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत ४४.७१ कोटी निधी अर्थसंकल्पित होता. त्यापैकी ४४.७० कोटी रुपये मिळाले आणि ते खर्चसुद्धा झाले आहेत. आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रअंतर्गत ४८.५० कोटी रुपये निधी प्राप्त झाला. त्यांपैकी ४८.४८ कोटी रुपये म्हणजेच ९९.९५ टक्के खर्च झाला आहे. सन २०२१-२२ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्याला सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र असे एकूण २५४.९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सन २०२०-२१ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मेडिकल कॉलेज येथे विषाणू संशोधन प्रयोगशाळा १३०.६५ लाख रुपयांतून, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशनअंतर्गत ई-फेरफार प्रणाली अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना १४१.६० लाख रुपयांतून लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले.

राज्य पोलीस बटालियनला बंकबेडकरिता २४.७८ लाख रुपयांचा निधी, जिल्हा क्रीडासंकुलातील आधुनिक सोयीसुविधांसाठी ९०.२४ लाख, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या बैठकीच्या व्यवस्थेकरिता (डेस्क-बेंच) करिता १०३.८४ लाख, जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १० शासकीय गोदामांकरिता १२ लाखांचा निधी देण्यात आला. जिल्ह्यात नियोजन भवनाच्या इमारतीकरिता पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याची माहिती पालकमंत्री मलिक यांनी दिली. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, जिल्हाधिकारी नयना गुंडे, आमदार विनोद अग्रवाल, आमदार अभिजित वंजारी, आमदार सहेसराम कोरोटे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते.

...............................

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बालरोग कक्ष उभारण्यात येणार आहे. धानाचा जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यात गोदामाची समस्या असल्याने यानंतर जिल्हा नियाेजनातून धानासाठी गोदाम तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर राहणार नाही. ८० कोटी रुपये धानाचे चुकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आहेत, ते स्वातंत्र्यदिनानंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजूर होतील. ती रक्कम लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच बोनसची ५० टक्के रक्कमही लवकरच मिळणार असल्याचे मंत्री मलिक यांनी सांगितले.