शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

२६८१८ शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 6:00 AM

गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक धान आहे. वर्षातून पावसाळी पिकावरच शेतकऱ्यांचा जोर असतो. यंदा उशीरा आलेला पाऊस खूप लांबल्यामुळे हलक्या धानाचे नुकसान झाले. कापणीवर आलेले धान शेतातच असताना पावसाने दम सोडला नाही. आठ दिवसासाठी पाऊस बंद झाल्याने आता पाऊस येणार नाही असे शेतकऱ्यांना वाटल्याने आलेले धान कापणे सुरू केले.

ठळक मुद्दे७८१ गावातील शेतकऱ्यांना फटका : १४ हजार हेक्टरमधील पीक संकटात

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीच्या पूर्वीपासूनच धान कटाईला सुरूवात होते. परंतु यंदा पावसाने थैमान घातल्याने हातात येणारे पीकही वाया गेले. अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील १३ हजार ७६७.९२ हेक्टर मधील धानपिकाचे नुकसान झाले. या नुकसानीचा फटका जिल्ह्यातील २६ हजार ८१८ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील ७८१ गावात परतीच्या पावसाचा कहर दिसून येत आहे.गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक धान आहे. वर्षातून पावसाळी पिकावरच शेतकऱ्यांचा जोर असतो. यंदा उशीरा आलेला पाऊस खूप लांबल्यामुळे हलक्या धानाचे नुकसान झाले. कापणीवर आलेले धान शेतातच असताना पावसाने दम सोडला नाही. आठ दिवसासाठी पाऊस बंद झाल्याने आता पाऊस येणार नाही असे शेतकऱ्यांना वाटल्याने आलेले धान कापणे सुरू केले. परंतु वातावरणाच्या बिघाडामुळे परतीच्या पावसाने झोडपले व त्यामुळे शेतकऱ्यांचे धान पाण्यात सापडले. जिल्ह्यातील ७८१ गावांतील २६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तयार केला आहे.जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार ९.६० हेक्टर क्षेत्रात धान पीक लावण्यात आले आहे. त्यातील १३ हजार ७६७.९२ टक्के धानाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान असलेल्या १५ हजार १०७ शेतकऱ्यांचे सात हजार ८४९.५२ हेक्टर धान पीकाचे नुकसान झाले. तर ३३ टक्क्यापेक्षा अधिक ११ हजार ७११ शेतकऱ्यांचे पाच हजार ९१८.४० हेक्टर धानपीकाचे नुकसान झाले. सर्वात जास्त नुकसान तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले. नुकसानग्रस्त असलेल्या शेतकºयांच्या संख्येत गोंदिया तालुक्यात २९८७, तिरोडा तालुक्यात ५६७५, आमगाव तालुक्यात ४५३६, सालेकसा तालुक्यात १३८६, देवरी तालुक्यात ९८७, गोरेगाव तालुक्यात ४६३९, सडक-अर्जुनी तालुक्यात २२१८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४३९० असे एकूण २६ हजार ८१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गीक आपदेत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.७२८६ शेतकºयांचे पंचनामे अद्याप झाले नाहीपाऊस आला व कापणी झालेल्या कळपा पाण्यात गेल्या. यात शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील १५ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाला पोहचता आले असून उर्वरीत सात हजार २८६ शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी पोहचले नाहीत. गोंदिया तालुक्यातील १०६६, आमगाव तालुक्यातील २६२, सालेकसा तालुक्यातील १६०, देवरी तालुक्यातील ७११, गोरेगाव तालुक्यातील १२८०, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९२३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २८८४ अशा सात तालुक्यातील सात हजार २८६ शेतकऱ्यांच्या धानाचे अद्याप पंचनामे झाले नाहीत.३७५१ शेतकऱ्यांनीच काढला विमाअवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकºयांची संख्या २६ हजार ८१६ आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यातील फक्त तीन हजार ७५१ शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. गोंदिया जिल्ह्यात ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. परंतु ज्या २६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची चौकशी केली असता पीक विमा करणारे तीन हजार ७५१ शेतकरी आढळले. पीक विमा घेणाऱ्या तीन हजार ७५१ शेतकºयांचे नुकसान झालेले क्षेत्र एक हजार १६१.०५ हेक्टर असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

टॅग्स :Rainपाऊस