शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

२८ घाटांनी दिला १३ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 8:37 PM

मागीलवर्षी बहुतांश रेती घाटांचे लिलाव न झाल्यामुळे रेतीमाफीयांकडून रेती चोरी केली जात होती.

ठळक मुद्देरेती घाटांचा लिलाव : अपेक्षित रकमेच्या दुपटीने लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागीलवर्षी बहुतांश रेती घाटांचे लिलाव न झाल्यामुळे रेतीमाफीयांकडून रेती चोरी केली जात होती. यंदा ३० सप्टेंबरपर्यंत ई-निविदा व ई -लिलाव करण्यात आला. यात जिल्ह्यातील २८ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला. या घाटांचा लिलाव १३ कोटी ५७ लाख ७२ हजार ७९२ रूपयांत झाला आहे. या २८ घाटांच्या लिलावासाठी शासनाला ६ कोटी १० लाख १८ हजार ३६८ रूपये अपेक्षीत होते. परंतु दुपटीपेक्षाही अधिक किंमतीत या घाटांचा लिलाव झाला आहे.गोंदिया तालुक्यातील देवरी रेती घाट लिलावाची शासनाने अपेक्षीत रक्कम ६७ लाख ९५ हजार ८४६ रूपये ठेवली होती. परंतु हे घाट एक कोटी ५१ लाख ९१ हजार ८४६ रूपयांना विकत घेण्यात आले. किन्ही घाटची अपेक्षीत रक्कम २१ लाख २ हजार ४०३ रूपये होती. परंतु हे घाट ५० लाख १६ हजार ४०३, सतोना (महादेव) घाटची अपेक्षीत रक्कम १३ लाख ५८ हजार ९२८ रूपये होती. परंतु हे घाट ३४ लाख ६३ हजार ९२८ रूपयांना, मुरदाडा (नविन) घाटची अपेक्षीत रक्कम ३३ लाख ९८ हजार २२४ रूपये होती. परंतु हे घाट ८० लाख २७ हजार २२४ रूपयांना, सतोना (गावघाट) घाटची अपेक्षीत रक्कम १३ लाख ५८ हजार ९२८ रूपये होती. परंतु हे घाट ६० लाख ९३ हजार ९२८ रूपयांना विकत घेण्यात आले.तिरोडा तालुक्यातील चांदोरी (बु.) घाटची अपेक्षीत रक्कम ३० लाख ५८ हजार ४० रूपये होती. परंतु हे घाट ५३ लाख ६६ हजार ४० रूपयांना, घाटकुरोडा-१ घाटची अपेक्षीत रक्कम एक कोटी २७ लाख ४२ हजार ४३७ रूपये होती. परंतु हे एक कोटी घाट ४१ लाख ४२ हजार ४७३ रूपयांना, बोंडराणी घाटची अपेक्षीत रक्कम ७६ लाख ४५ हजार १०२ रूपये होती. परंतु हे घाट एक कोटी ७० लाख ४४ हजार १०२ रूपयांना, घाटकुरोडा -२ घाटची अपेक्षीत रक्कम एक कोटी २७ लाख ४२ हजार ४३७ रूपये होती. परंतु हे घाट दोन कोटी ८४ लाख ९८ हजार रूपयांना विकत घेण्यात आले.देवरी तालुक्यातील घोनाडी घाटची अपेक्षीत रक्कम १ लाख ५९ हजार २७३ रूपये होती. परंतु हे घाट १ लाख ६९ हजार ३७३ रूपयांना, वासनी-१ घाटची अपेक्षीत रक्कम २ लाख ३८ हजार ६०९ रूपये होती. परंतु हे घाट २ लाख ४६ हजार ६०९ रूपयांना, आमगाव तालुक्यातील बाम्हणी घाटची अपेक्षीत रक्कम ५ लाख ३० हजार ७१० रूपये होती. परंतु हे घाट २७ लाख ३० हजार ७१० रूपयांना, ननसरी दुमोहन घाटची अपेक्षीत रक्कम ७ लाख ९६ हजार ३६५ रूपये होती. परंतु हे घाट ८७ लाख २० हजार रूपयांना, मानेकसा घाटची अपेक्षीत रक्कम ५ लाख ३० हजार ७१० रूपये होती. परंतु हे घाट २२ लाख ९३ हजार ७१० रूपयांना, घाट्टमेनी घाटची अपेक्षीत रक्कम १० लाख ६२ हजार २० रूपये ठेवली होती. परंतु हे घाट ६२ लाख २ हजार २० रूपयांना विकत घेण्यात आले.सालेकसा तालुक्यातील भाडीपार घाटची अपेक्षीत रक्कम ८५ हजार ९४७ रूपये होती. परंतु हे घाट ९१ हजार ९४७ रूपयांना, धानोली रेती घाटची अपेक्षीत रक्कम १ लाख ४३ हजार ४५ रूपये होती. परंतु हे घाट ४ लाख ४५ रूपयांना, दरबडा घाटची अपेक्षीत रक्कम १ लाख २७ हजार ४१८ रूपये होती. परंतु हे घाट १ लाख ६८ हजार ४१८ रूपयांना, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील महागाव घाटची अपेक्षीत रक्कम ३ लाख ८२ हजार २५५ रूपये होती. परंतु हे घाट ३ लाख ९५ हजार २५५ रूपयांना, वडेगाव/बंध्या घाटची अपेक्षीत रक्कम ३ लाख १८ हजार ५४६ रूपये होती. परंतु हे घाट ३ लाख ७५ हजार ५४६ रूपयांना, सडक-अर्जुनी तालुक्यातील पिपरी-२ घाटची अपेक्षीत रक्कम ७ लाख ९६ हजार ३६५ रूपये होती. परंतु हे घाट ३० लाख ५१ हजार ३६५ रूपयांना, पळसगाव/राका घाटची अपेक्षीत रक्कम ११ लाख १४ हजार ९१० रूपये होती. परंतु हे घाट १७ लाख ८ हजार रूपयांना, कोदामेडी घाटची अपेक्षीत रक्कम ६ लाख ३७ हजार ९२ रूपये होती. परंतु हे घाट ७ लाख ७५ हजार ९२ रूपयांना, सावंगी-१ घाटची अपेक्षीत रक्कम ५ लाख ३० हजार ७१० रूपये होती. परंतु हे घाट ७ लाख ७५ हजार ७१० रूपयांना, वडेगाव घाटची अपेक्षीत रक्कम ६ लाख ३७ हजार ९२ रूपये होती. परंतु हे घाट ८ लाख ८० हजार ९२ रूपयांना,घाटबोरी/तेली घाटची अपेक्षीत रक्कम ६ लाख ३७ हजार ९२ रूपये होती. परंतु हे घाट ११ लाख ६७ हजार ९२ रूपयांना, सावंंगी-२ घाटची अपेक्षीत रक्कम ८ लाख ४९ हजार २५५ रूपये होती. परंतु हे घाट २२ लाख ७६ हजार २५५ रूपयांना देवपायली घाटची अपेक्षीत रक्कम २ लाख ३८ हजार ६०९ रूपये ठेवली होती. परंतु हे घाट ५ लाख १ हजार ६०९ रूपयांना विकत घेण्यात आले.