उद्घाटन प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश चुऱ्हे होते. याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अरविंद शंभरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले, पंचायत समितीच्या माजी सदस्य मंजू डोंगरवार, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. श्रीकांत वाघाये, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. चंद्रशेखर मालापुरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष चरण सहारे, शुभांगी वाढवे प्रामुख्याने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात भाग्यश्री मोहबंशी, टेकचंद शेंडे, सचिन लाडे, निखिल खोटेले, दिलीप पडोळे, नितेश खोटेले, संजय खोटेले, नरेश खोटेले, रजनिश खेकरे, स्वरुप खोटेले, बबन निंबेकर, महेश राणे, पुरुषोत्तम खोटेले, प्रणव ठेंगरे, सुनील बुरांडे, भागवत मेंढे, निखिल मेंढे, रोमित मेंढे, हितेश दोनोडे, गौरव दोनोडे, सुनील पारधी, सहारे, पवन पदम व इतर अशा २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ. रोशन अंड्रस्कार यांनी केले होते. संचालन डुडेश्वर लांजेवार यांनी केले. आभार डॉ. मालापुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. महेंद्रकुमार हरिणखेडे, डॉ. पवन पदम, बी.एल.बडोले, निरंजन कापगते, एन.ए.सहारे, कर्मचारी तसेच सर्पमित्रांनी सहकार्य केले.