शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

३० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:00 AM

अनेक अधिकारी आले नि बदलून गेले मात्र तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांंच्या या (ऑऊटलेट) पाईप दुरुस्तीच्या मागणीला कुणीही भीक घातली नाही.यावरून पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी गडेलठ्ठ वेतन घेणारे एवढे निष्ठुर कसे असू शकतात यांचे ज्वलंत उदाहरण येथे बघावयास मिळते. हे सर्व शेतकरी धानाची शेती करतात.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून संघर्ष। इटियाडोह पाटबंधारे विभागाचा प्रताप, शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : पाटबंधारे विभागाची दप्तर दिरंगाई आणि कर्तव्याबद्दलची उदासीनता यामुळे ३० हेक्टर शेती मागील १५ वर्षांपासून सिंचनापासून वंचित आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.शेती कोरडवाहू असो की सिंचनाची, कोणताही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. संत्रा, कापूस, सोयाबीन, गहू, तूर की धान उत्पादक शेतकरी असो प्रत्येकाच्या समस्या आहेत.उच्च प्रतीचे पीक घेऊनही ते घरी खायचे सौभाग्य यांच्या नशिबात नाही.कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट यांच्या पाचवीलाच पुजला आहे. आता बघा ना, इटियाडोह धरण क्षेत्राच्या मोरगाव कालव्यालगत तीस हेक्टर शेतीला गेल्या १५ वर्षांपासून सिंचनच होत नसल्याची गंभीर तेवढीच संतापजनक बाब पुढे आली आहे. या शेतीला कालव्याच्या पूर्वेकडील मोरगाव तलावातून सिंचन सुविधा पुर्वापार काळापासून उपलब्ध होती. तलाव आणि सदर शेतीच्या मधातून हा कालवा गेला आहे. त्यामुळे तलावातील पाणी कालव्यावरून (ऑऊटलेट) पाईपद्वारे शेतात सोडण्याची सोय करण्यात आली. सिंचन व्यविस्थत सुरू होते. पंधरा वर्षापूर्वी सदर (ऑऊटलेट) पाईपलाईन तुटली व कालव्यात कोसळली, याची तक्रार विभागाला देण्यात आली. अनेक अधिकारी आले नि बदलून गेले मात्र तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांंच्या या (ऑऊटलेट) पाईप दुरुस्तीच्या मागणीला कुणीही भीक घातली नाही.यावरून पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी गडेलठ्ठ वेतन घेणारे एवढे निष्ठुर कसे असू शकतात यांचे ज्वलंत उदाहरण येथे बघावयास मिळते. हे सर्व शेतकरी धानाची शेती करतात. धानाला भरपुर पाणी लागते. पावसाळ्यात जर पावसाने दगा दिला तर अनेकदा एका पाण्यासाठी हातात असलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती असते.या स्थितीत पीक वाचिवण्यासाठी शेतकऱ्यास दोन हजार रुपये खर्च करून दुसऱ्याकडून पाण्याची सोय करावी लागते. हा अधिकचा भार सोसावा लागतो.पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर शेती कशीतरी होऊन जाते.मात्र रब्बीची हंगाम पाण्याअभावी होत नाही. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न या कुटुंबासमोर असतो. पंधरा वर्षांचा वनवास हे शेतकरी भोगत आहेत.हे शेतकरी पाईपलाईन दुरु स्ती करून पाणी मिळवण्यासाठी वारंवार बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाचे उंबरठे झिजवून थकले, याच कालावधीत माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार, खासदार या सर्वांनाच निवेदने दिलीत.मात्र पदरात काहीच पडले नसल्याने या चाळीस शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा वाली कोण? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निधी नसल्याचे अधिकारी सांगतात. याबाबतीत आम्ही जेव्हा जेव्हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले त्या प्रत्येकाने आम्हाला निधी उपलब्ध नसल्याची माहिती देऊन दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडित शेतकरी आनंदराव शहारे यांनी केला आहे.कालव्याच्या सफाईकडे दुर्लक्षकालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात झाडांचे जंगल तयार झाले आहे. त्यामुळे पात्रच दिसत नाही.गाळ काढण्याचे काम अनेक वर्षांपासून झाले नसल्याने पात्र उथळ झाले आहेत. कित्येक ठिकाणी कालव्याची पाळ खचून पात्र रु ंदावले असल्याने कुठल्याही प्रकारची दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.मुख्य कालव्यात गाळ साचल्याने सिंचनासाठी धरणातून निर्धारित पाणी सोडलेच जात नाही.कालव्याची कालमर्यादा संपलेली आहे. कालव्यातून निर्धारित पाणी सोडले तरी जीर्ण ठिकाणी कालवे फुटतात. परिणामत: शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्धच होत नाही.कालव्यात वाढलेली मोठमोठी झाडे पाणी शोषण करतात हे सुद्धा एक कारण आहे. कालव्याच्या नुतनीकरणाकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प