लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थानिक नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.१६) आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकूण ३२ विषय ठेवण्यात आले होते. अडीेच तास चाललेल्या सभेत सर्व ३२ विषयांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे सभेच्या विषय सूचित महत्त्वाचे मुद्दे नसल्याने याच विषयांवर सभागृहात सर्वाधिक वादग्रस्त चर्चा झाल्याची माहिती आहे.स्थायी समितीच्या सभेला नगर परिषद सभागृहात बुधवारी १२ वाजता सुरूवात झाली. सभेला नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, मुख्याधिकारी चंदन पाटील, सभापती दीपक बोबडे, विमल मानकर, आशालता चौधरी, रत्नमाला शाहू, भाजपा गटनेता घनश्याम पानतवने, काँग्रेसचे सुनील तिवारी, सचिन शेंडे उपस्थित होते. सभेला सुरूवात होताच तिवारी यांनी शहरात एलईडी लाईट लावण्याचे काम अत्यंत मंदगतीने सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. विशेष म्हणजे सभेच्या विषय सूचित हा मुद्दा नव्हता. मात्र याच विषयावर सभेत सर्वाधिक चर्चा झाली. नगर परिषदेने शहरातील विद्युत पथदिव्यांवर ३५ व्हॅटचे एलईडी लाईट लावण्याचे कंत्राट कंपनीला दिले होते. मात्र कंपनीकडून १८ व्हॅटचे लाईट लावले जात आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला.या वेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांना पुरेशा प्रमाणात साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदस्यांनी शहरातील वाहतुकीस अडचण ठरणारे विद्युत खांब काढून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. या विषयाला मंजुरी देण्यात आली. हे काम नाविण्यपूर्ण योजनेत करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आर्थिक मंजुरी देण्यात आली. शहरात होर्डिंग व बॅनर लावणाऱ्याकडून टॅक्स वसुली करण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.शहरात चार ठिकाणी ट्राफीक सिग्नल आणि ४० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेवून पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचे दर निश्चित करणे, २० नवीन बोअरवेल तयार करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरातील बाजारपेठेत महिलांसाठी स्वच्छतागृह तयार करण्याच्या कामाला सभेत मंजुरी देण्यात आली.कचऱ्यांसाठी मोजावे लागणार पैसेस्वच्छता सर्वेक्षण २०१९ अंतर्गत घन कचरा व्यवस्थापनाकरिता युजर चार्जेस शहरवासीयांना द्यावे लागणार आहे. यातंर्गत प्रती घर ४० रुपये, प्रती दुकान ६० रुपये, प्रती रुग्णालय ८० रुपये दर महिन्याला द्यावे लागणार आहे. याची अंमलबजावणी १ जानेवारी २०१९ पासून करण्यात आली आहे. तर ओल्या आणि कोरड्या कचऱ्यासाठी हेच दर राहणार आहेत.
अडीच तासाच्या सभेत ३२ विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:44 AM
स्थानिक नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.१६) आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकूण ३२ विषय ठेवण्यात आले होते. अडीेच तास चाललेल्या सभेत सर्व ३२ विषयांना मंजुरी देण्यात आली.
ठळक मुद्देन.प.स्थायी समितीची सभा : विषय सूचित महत्त्वाचा विषय नाही