नरेश रहिले ।आॅनलाईन लोकमतगोंदिया : यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार आहे. मागील वर्षी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पाणी टंचाई नव्हती परंतु यंदा पहिल्या टप्प्यापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. टँकरमुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पाण्याचे टॅँकर लावण्याची वेळ येऊ शकते. कारण यंदा ३३२ गावे तर ५६ वाड्यांमध्ये तिव्र पाणी टंचाई भासणार असल्याचे चित्र आहे. यासाठी जिल्हा परिषदेने ६१६ उपाय योजनांचा आराखडा तयार केला आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पहिला, दुसरा व तिसºया टप्प्याचा पाणी टंचाई आराखडा घेतला. या तिन्ही आराखड्यात पाणी टंचाई आढळली आहे. पहिला टप्पा आॅक्टोबर ते डिसेंबरचा होता. या पहिल्या आराखड्यात ३४ गावे व एक वाडी पाणी टंचाई ग्रस्त आढळली. हा टप्पा निघून गेला तरी यासाठी पाणी पुरवठा सुरू झाला नाही. पहिल्या टप्प्यासाठी ३६ हातपंप दुरूस्ती व १६ सार्वजनिक विहीरींना इनवेल बोअर करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. या योजनांवर ९ लाख ५८ हजार रूपये खर्च करण्याचे ठरविले. याचे अंदाजपत्रक तयार करणे सुरू आहेत.परंतु उपाययोजना करण्यासाठी कामे सुरूच झाली नाही. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्चचा आहे. या टप्प्यात १४० गावे ३० वाड्या पाणी टंचाईग्रस्त असल्याचे जाणवले. येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २७७ उपाययोजना केल्या आहेत. या योजनांवर ५६ लाख ८२ हजार रूपये खर्च करण्याची तयारी दर्शविण्यात आली.त्याचेही अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहेत. तर तिसºया टप्प्यात १५८ गावे २५ वाड्या पाणी टंचाईग्रस्त असल्याचे जाणवले. या टंचाईवर मात करण्यासाठी २८६ उपाययोजना केल्या आहेत. त्यावर ५९ लाख ९४ हजार रूपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जमीनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष्य आतापासून भासत आहे.जिल्ह्यात ३३२ गावे व ५६ वाड्यांमध्ये संभाव्य पाणी टंचाई असल्यामुळे ६१६ उपाययोजना करण्यात आल्या असून त्यासाठी १ कोटी २६ लाख ३४ हजार रूपये खर्च करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.१५३ विहिरींमध्ये इनवेल बोअरजिल्ह्यात ३३२ गावे ५६ वाड्या पाणी टंचाईग्रस्त आहेत. या गावांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ६१६ उपाययोजना तयार केल्या असून १५३ ठिकाणी विहिरींमध्ये इनवेलबोअर, ३४ ठिकाणी विंधन विहीर, एका नळ योजनेची विशेष दुरूस्ती व ४२८ हातपंप दुरूस्ती करण्यात येणार आहे.पाणी तोंडात की डोळ्यात?मागील वर्षी पाऊस बऱ्यापैकी पडला होता. तरीही २० गावांमध्ये पाण्याची टंचाई होती. त्यासाठी कोट्यवधीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु अख्खा उन्हाळा निघूनही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले नव्हते. कोट्यवधीची गरज असताना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फक्त सात ठिकाणी बोअर करण्यात आले होते. यंदा पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना एका तालुक्यासाठी कोट्यवधी रूपयांची मागणी करायला पाहिजे होती. परंतु अख्या जिल्ह्यासाठी फक्त १ कोटी २६ लाख रूपये मागण्यात आल्याने त्यातून मिळणार किती व उपाय योजना करणार कशा हा प्रश्नच आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी तत्परता दाखवावी. पाण्यासाठी नागरिकांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ येऊ देऊ नका असा आर्त टाहो नागरिकांचा आहे.
३३२ गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 9:46 PM
यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार आहे. मागील वर्षी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पाणी टंचाई नव्हती परंतु यंदा पहिल्या टप्प्यापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे.
ठळक मुद्दे५६ वाड्यांत पाणी टंचाई : जिल्हा परिषदेचा ६१६ उपाय योजनांचा आराखडा