लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना सण अग्रीम राशी देण्यात आली. परंतु आमगाव पंचायत समिती मधील ३६ शाळांतील शिक्षकांना सण अग्रीम राशी देण्यात आली नाही. या संदर्भात शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे यांनी बुधवारी (दि.५) शिष्टमंडळासोबतच्या सभेत मुद्दा मांडला. यात मुख्य कार्यपालन अधिकारी(सीईओ) डॉ. राजा दयानिधी यांनी सभेत उपस्थित शिक्षणाधिकारी उल्हास नरड, लेखा व वित्त अधिकारी मडावी यांच्याशी याबद्दल सहानिश करुन लगेच ३६ शाळांतील शिक्षकांना सण अग्रीम देण्याचे निर्देश दिले.शिष्टमंडळात शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये नागपूर येथे झालेल्या मागील शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाचे अनुपालन अहवाल येत्या १५ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले. शासनाकडून आदेश येताच कपात केलेले ३ दिवसांचे वेतन काढण्यात येईल असे सांगीतले. तसेच १२ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विनाअट चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करणे, डीसीबीएस कपात बंद करणे, जी.पी.एफ. व डीसीपीएस कपातीचा हिशोब व पावत्या देणे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षक व केंद्र प्रमुख यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणे, अप्रशिक्षीत शिक्षकांना शिक्षण सेवक पदावर व्यतीत कालवधी वरिष्ठ वेतणश्रेणीसाठी ग्राह्य धरणे, सहायक शिक्षीका वर्षा बावनथडे यांचा वाचन भत्ता प्रकरण निकाली काढणे, अस्थाई ३६ शिक्षक-कर्मचाऱ्यांना कायमतेचा लाभ देणे, निवड श्रेणी यादी मंजूर करणे, १२ वी विज्ञान असणाºया पदवीधर शिक्षकांना गणित विषयात समाविष्ट करणे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाचे प्रकरण निकाली काढणे, अवघड शाळेची नव्याने निश्चिती करणे, पाच वर्ष पूर्ण झालेल्या स्व.खे.मंडळाची निवडणूक घेणे, शिक्षण समितीवर संघटनेच्या एक प्रतिनिधी सदस्य म्हणून घेणे, शालेय स्तरावर वारंवार माहिती न मागविणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करुन सदर मागण्या सोडविण्यात येईल असे दयानिधी यांनी सांगीतले.शिष्टमंडळात सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक दिवाकर खोब्रागडे, शिक्षक समितीचे अध्यक्ष मनोेज दिक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, सुरेश कश्यप, बी.आर.पारधी, संदीप तिडके, एन.बी.बिसेन, प्रदीप रंगारी, डी.एम.गुप्ता, विनोद बहेकार, पी.बी.सर्याम, धनाजी नाईक उपस्थित होते.
३६ शाळांतील शिक्षकांचे सण अग्रीम लगेच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 10:23 PM
संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना सण अग्रीम राशी देण्यात आली. परंतु आमगाव पंचायत समिती मधील ३६ शाळांतील शिक्षकांना सण अग्रीम राशी देण्यात आली नाही. या संदर्भात शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे यांनी बुधवारी (दि.५) शिष्टमंडळासोबतच्या सभेत मुद्दा मांडला.
ठळक मुद्देराजा दयानिधी : शिक्षक समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा