यासंदर्भात निरजकुमार शर्मा याच्या विरुद्ध सालेकसा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कावराबांध येथील ओमप्रकाश गोपालदास लिल्हारे यांनी १२ जुलै २०२० रोजी कावराबांध येथे एलईडी लाइट बनविण्याचा उद्योगासाठी लागणारे कच्चे साहित्य दिल्ली येथील निरजकुमार शर्मा यांच्याकडून आयकोर नावाने असलेल्या कंपनीसाठी मागितले होते. कावराबांध येथील आयकोर कंपनी एलईडी लाइट तयार करण्याकरिता लागणारा कच्चा मागिवले होता. ते साहित्य ऑनलाइनने मागिवले. यात ५ लाख २२ हजारांचा व्यवहार केला. त्यापैकी आरोपी निरजकुमार शर्मा याने कच्चा माल न देता ऑनलाइन १ लाख ६२ हजार रुपये परत केले. उर्वरित ३ लाख ६० हजार परत केले नाही. यासंदर्भात सालेकसा पोलिसात भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक जानकर करीत आहेत.
३.६० लाखाने तरुणाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:18 AM