शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

३६४ अंगणवाड्या मरणासन्न; काळजाच्या तुकड्यांचा जीव मुठीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 4:45 PM

नादुरुस्त वर्गखोल्यांत ज्ञानार्जन : ९७ अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारतीच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी अंगणवाडीत पाठविले जाते, परंतु स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या चिमुकल्यांना चक्क धोक्याच्या अंगणवाड्यांत पाठविले जाते. जिल्ह्यातील ३६४ अंगणवाड्या चिमुकल्यांसाठी धोकादायक आहेत.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत धोकादायक अंगणवाड्या आहेत. १७४ अंगणवाड्यांच्या इमारती जीर्ण तर १९० अंगणवाड्यांच्या इमारती अतिजीर्ण झाल्या आहेत. या नादुरुस्त अंगणवाड्यांमधून सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील हजारो चिमुकले शिक्षणाची गोडी लावण्यासाठी जात आहेत. अशा अंगणवाड्यांत मुलांना शिकायला पाठविणे धोकादायक आहे. जीव धोक्यात घालून चिमुकल्यांना अंगणवाड्यांत जावे लागत आहेत. मात्र, आपल्या मुलांना अशा अंगणवाड्यांत पाठविताना पालक चिंतित आहेत. 

धोकादायक अंगणवाड्यांमध्ये मुलांना पाठविणे आई-वडिलांना धोक्याचे वाटत आहे. अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या अंगणवाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट जिल्हा परिषदेकडून केले जात नसून फक्त अंगणवाड्या धोकादायक असल्यास याबाबत अहवाल दिला जातो. 

९७ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांची परिस्थिती पाहता, ९७ अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नसल्याने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही चिमुकल्यांसाठी अंगणवाडीची सोय करण्यात शासन अपयशी ठरले आहे. गोंदिया-१ अंतर्गत ११, गोंदिया-२ अंतर्गत २, अर्जुनी- मोरगाव ८, गोरेगाव ७, देवरी १४, सालेकसा ३, सडक-अर्जुनी १८, तिरोडा ३१, आमगाव ३ अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नाहीत.

जिल्ह्यातील जीर्ण व अतिजीर्ण इमारती प्रकल्पनिहायप्रकल्प                           जीर्ण                          अजीर्ण गोंदिया-१                         २९                                 १८गोंदिया-२                         ०३                                 २४अर्जुनी-मोरगाव                  ४२                                २३ गोरेगाव                            १२                                 २३देवरी                                १४                                १४सालेकसा                          ०८                                ३७ सडक - अर्जुनी                   २८                                १७तिरोडा                              २१                                २२आमगाव                            १७                                १२एकूण                               १७४                              १९०

टॅग्स :Educationशिक्षणgondiya-acगोंदिया