लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अवघ्या देशातच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असून कुणालाही अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडण्यावर बंदी लावण्यात आली आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण शहरातील रस्त्यांवर वाहनाने फिरणाºया ३७४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. २२ ते २८ मार्चदरम्यान वाहतूक पोलिसांनी या कारवाया केल्या असून त्यांच्याकडून ७७ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर होत चालली असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारपासून (दि.२५) देशात ‘लॉकडाऊन’ केला आहे. त्यासोबतच गर्दीवर आळा घालणे,साथरोग प्रतिबंध आदि विविध कलमा जिल्ह्यात लागू करण्यात आल्या आहेत. एकंदर कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये व कोरोनासोबत सुरू असलेल्या या लढ्याला सहकार्य करण्याचे शासनाने आवाहन केले आहे.शासनाच्या या आवाहनाला मान देत बहुतांश सुज्ञ नागरिक आपापल्या घरात राहून कोरोनाशी लढण्यास शासनाला आपल्या परीने मदत करीत आहेत. मात्र असे असतानाही काही बेजबाबदार लोकं विनाकारण घराबाहेर पडून शासन आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. अशा सर्व बेजबाबदार नागरिकांना घरात जाण्याचा सल्ला पोलीस कर्मचारी देत आहेत. मात्र त्याचा काहीच परिणाम जाणवित नसून ‘लॉकडाऊन’ असतानाही काही विघ्नसंतोषी बाहेर फिरतच आहेत. अशात ३७४ बेजबाबदार नागरिकांना वाहतूक पोलिसांनी दणका देत कारवाई केली आहे.२२ ते २८ मार्च दरम्यान पोलिसांनी या कारवाया केल्या असून त्यांच्याकडून ७७ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.शासनाला सहकार्य करादेशात कोरोना गंभीर रूप घेत आहे.त्यामुळे कोरोनाशी सुरू असलेल्या लढ्यात प्रत्येकाने आपल्या घरात बसून शासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.-दिनेश तायडे,निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया
विनाकारण फिरणाऱ्या ३७४ जणांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:00 AM
कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर होत चालली असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारपासून (दि.२५) देशात ‘लॉकडाऊन’ केला आहे. त्यासोबतच गर्दीवर आळा घालणे,साथरोग प्रतिबंध आदि विविध कलमा जिल्ह्यात लागू करण्यात आल्या आहेत. एकंदर कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये व कोरोनासोबत सुरू असलेल्या या लढ्याला सहकार्य करण्याचे शासनाने आवाहन केले आहे.
ठळक मुद्देवाहतूक पोलिसांनी केली कारवाई : ७७ हजार २०० रूपयांचा दंड वसूल