शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

जि.प.शाळांमध्ये सुरू होणार ३८ कॉन्व्हेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:39 AM

जिल्हा परिषद शाळेकडे होणारे दुर्लक्ष पाहून महाराष्ट्र शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम अंमलात आणला. गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळांमध्ये मिळू लागल्याने विद्यार्थ्यांचा कल आता जि.प. शाळेकडे वाढत असल्याचे चित्र आहे. परंतु खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना जिल्हा परिषदेच्या शाळेने टक्कर द्यावी.

ठळक मुद्देभौतिक सुविधात वाढ व मिळू लागले गुणवत्तापूर्ण शिक्षण : जि.प.शाळांचा कायापालट

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद शाळेकडे होणारे दुर्लक्ष पाहून महाराष्ट्र शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम अंमलात आणला. गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळांमध्ये मिळू लागल्याने विद्यार्थ्यांचा कल आता जि.प. शाळेकडे वाढत असल्याचे चित्र आहे. परंतु खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना जिल्हा परिषदेच्या शाळेने टक्कर द्यावी. यासाठी जिल्ह्यातील १०९९ जि.प.शाळांपैकी ३८ शाळेत मागील वर्षीपासून कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले. यावर्षी पुन्हा ३८ कॉन्व्हेंट सुरू करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण करणे व शाळासिध्दीत गुणांकन वाढविण्यासाठी १ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या तीन महिन्यात जिल्ह्यातील विशेष सहाय्याची गरज असलेल्या २४० शाळांचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रगत शाळा, डिजीटल शाळा, ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षण दिले. शाळांमध्ये आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी स्पर्धा वाढत आहे. १०० टक्के विद्यार्थ्यांचे मराठी वाचन क्षमता विकसीत करणे, गणित संबोध विकसीत करणे, इंग्रजी वाचन क्षमता विकसीत करणे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्पोकन इंग्लीश क्षमता विकसीत करणे, विद्यार्थी व शिक्षकांचे विज्ञान संबोध विकसीत करणे, शाळेतील सर्व विषयात तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करणे, विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणे, अध्ययन अध्यापनात कृतीयुक्त पध्दतीने सामानिकरण रूजविणे, सामाजिक शास्त्राची स्पर्धा परीक्षेशी सांगड घालणे, शाळेत लोकसहभागातून भौतिक सुविधा मिळविणे, ज्ञानरचनावाद व आनंददायी पध्दतीने शिकविण्यास शैक्षणिक वातावरण निर्मीती करणे, विषयसाधन व्यक्ती व विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांचा स्तर निश्चीत करतील, विद्यार्थ्यांना कृतीयुक्त मार्गदर्शन व शिक्षकांना प्रात्याक्षीक देणे, शिक्षकांच्या अडचणी शोधून त्या दूर करणे, शिक्षकांना कार्यप्रवण करणे, भाषा, गणित व इंग्रजी विषयाचे शंभर टक्के कौशल्य मिळविणे, समाज सहभागासाठी व्यवस्थापन समितीची सभा, ग्रामपंचायत भेटी व ग्रामस्थांच्या भेटी घेणे, शाळांची प्रतवारी उंचावणे, शाळा प्रगतीचे अहवाल सादर करणे व शिक्षक परिषदांचे आयोजन करून चांगले कार्य करणाºया शिक्षकांना व्यासपीठ देण्याचेही काम केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा कल जि.प. शाळांकडे वाढत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.खासगी शाळेतील ३९५ विद्यार्थी परतलेजिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बोलक्या करण्यावर भर देण्यात आला. खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या ३९५ झाली आहे. गोरेगाव तालुक्यात ५४, सालेकसा ४४, अर्जुनी-मोरगाव १४, सडक-अर्जुनी १५, गोंदिया १२६, तिरोडा ६२, देवरी ३३ व आमगाव ४७ विद्यार्थ्यांनी खासगी शाळेतून जिल्हा परिषद शाळेत नाव दाखल केले.इंग्रजीतून परिपाठजिल्ह्यातील अनेक शाळेत इंग्रजीतून परिपाठ शिकवला जातो. शाळा शनिवारी दप्तरविरहीत शाळा, बेलमुक्त शाळा आहे. शाळेच्या परिसरातील झाडांना वैज्ञानिक नावे देणे, सामान्य ज्ञानावर दैनिक हजेरी, उन्हाळी विद्यार्थी सार्वजनिक पाणपोई, शालेय परिसरात उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणवट्याची सोय, शेवटच्या तासिकेला सामान्य ज्ञानावर पाच प्रश्न, विद्यार्थी सूचना तक्रार पेटी, आज माझा वाढदिवस, शालेय परसबाग, विद्यार्थी संचिका, संपूर्ण इंग्रजीतून परिपाठ, गावातील शिक्षण प्रेमींचे दैनिक अभ्यासिका वर्ग, विद्यार्थी रक्षाबंधन, वनराई बंधारा, वार्षिक स्नेहसंमेलन,पालक मेळावा असे उपक्रम राबविले जातात.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा