गोंदिया : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून स्वाध्याय उपक्रम राबवून त्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. इयत्ता पहिली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम ऑनलाईनच्या माध्यमातून शिकविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात वर्ग १ ते १० वी चे २ लाख २० हजार २६० विद्यार्थी आहेत.त्यापैकी ८३ हजार ३३१ विद्यार्थी या स्वाध्याय उपक्रमात जुळले आहेत. महाराष्ट्र गोंदिया जिल्हा स्वाध्याय उपक्रमात १५ व्या क्रमांकावर आहे. त्या आमगाव तालुक्यातील ८५४८ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव ६१५०, देवरी ८६४९, गोंदिया २८ हजार २८७, गोरेगाव ७ हजार ९९, सडक-अर्जुनी ७ हजार १९३, सालेकसा ७ हजार ८३०, तिरोडा ९ हजार ५७५ विद्यार्थी या स्वाध्याय उपक्रमात जुळले आहेत.
..............
अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी- २,२०,२६०
स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी- ८३३३१
स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी- ८२३३५
........
मराठीमाध्यमाचे सर्वाधिक विद्यार्थी
स्वाध्याय सोडविण्यात मराठी माध्यमाचे ६७.७६ टक्के, विज्ञानाचे ६०.५२ टक्के, उर्दू ५०.३१ टक्के, गणिताचे ६३.५५ टक्के विद्यार्थी या स्वाध्याय उपक्रमात जुळले असून ते स्वाध्याय सोडवित असतात. या सर्वात मराठी माध्यमाचे विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात मोठ्या प्रमाणात जुळले आहेत.
...
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये यासाठी स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यातील ८३ हजारावर विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून अभ्यास करीत आहेत.
-प्रदीप डांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया.
........
शाळा सुरू झाली तेव्हापासून आम्ही दीक्षा ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. नंतर स्वाध्याय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वत:चे मूल्यमापनाची सोय उपलब्ध झाली. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे गांभीर्याने पाहू लागले हा याचा फरक आहे.
-राजेश रूद्रकार, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया.
......
स्वाध्याय उपक्रमामुळे आमचे शिक्षण होऊ लागले. कोरोनाच्या संकटामुळे आमच्या दहावीचा वर्ष वाया जाईल का असे वाटत होते. परंतु स्वाध्याय उपक्रमामुळे आम्ही आणखीणच शिकू लागलो.
जीवन मेंढे, विद्यार्थी किंडगीपार.
..............
कोरोनामुळे आमच्या शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवण्यासाठी स्वाध्याय उपक्रम आणला. ऑनलाईन शिक्षण आम्हाला घरीच राहून घेता आले. आम्ही कुठे चुकतो हे स्वाध्यायच्या माध्यमातून समजले. शैक्षणीक वातावरण निर्मिती या ऑनलाईन शिक्षणामुळे होत नसली तरी अभ्यासाचे नुकसान कमी होत आहे.
सलोनी हुमे, विद्यार्थी आसोली.