नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना निसर्गावरच अवलंबून रहावे लागते. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार करविलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. मामा तलाव, लपा तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे व उपसा सिंचनांची दुरवस्था असल्यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार १७५ हेक्टर क्षेत्रातील सिंचन अडले आहे.गोंदिया जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १ हजार ४२१ आहे. या तलावांमुळे २८ हजार ७३० हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील १ हजार १८८ तलाव नादुरूस्त असल्यामुळे फक्त १६ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत आहे. हे तलाव नादुरूस्त असल्यामुळे १२ हजार ३५५ हेक्टरचे सिंचन होऊ शकत नाही. लघु पाटबंधारे प्रकल्पांची संख्या १९० आहे. या प्रकल्पांमुळे १० हजार ८४२ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील १०४ प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे फक्त ३ हजार ७७९ हेक्टर सिंचन होत आहे. हे प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे ७ हजार ६३ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ शकत नाही.जिल्ह्यात २६ पाझर तलाव असून यापासून २३१ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ३ तलाव नादुरूस्त असल्यामुळे फक्त ८९ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून १४२ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ अडले आहे. जिल्हयात २९४ कोल्हापूरी बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमुळे १० हजार ७४ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ शकते. मात्र ९३ बंधारे नादुरूस्त असल्यामुळे फक्त ३ हजार १५ हेक्टर सिंचन होत असून ७ हजार ५९ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकत नाही.तसेच १ हजार ४१५ साठवण बंधारे असून यापासून १२ हजार ८१६ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ६० बंधारे नादुरूस्त असल्यामुळे फक्त ६ हजार १३१ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून ६ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचीत आहे. याशिवाय १२ उपसा सिंचन प्रकल्प आहेत. या उपसा सिंचन प्रकल्पांमुळे १ हजार १४ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ९ उपसा सिंचन प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे फक्त १४३ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून ८७१ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकत नाही.जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत असलेल्या प्रकल्पांची संख्या ३ हजार ३५८ आहे. या प्रकल्पांची सिंचन क्षमता ६३ हजार ७०७ हेक्टर आहे. परंतु १ हजार ४५७ प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे फक्त २९ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून ३८ हजार १७५ हेक्टर क्षेत्राचे सिंचन अडून पडले आहे. आता सिंचनाची सोयच नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.दुरूस्तीसाठी १०८ कोटींची गरजमामा तलाव, लपा तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे व उपसा सिंचन प्रकल्पांची दुरवस्था झाल्यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार १७५ हेक्टर क्षेत्र सिंचीत होऊ शकत नाही. या सर्व प्रकल्पांच्या दुस्तीसाठी १०८ कोटी ४७ लाख रूपये लागणार आहेत. यात, मामा तलावांना ८१ कोटी ८६ लाख, लपा तलावांना १५ कोटी ३६ लाख, पाझर तलावांना १६ लाख, कोल्हापुरी बंधाऱ्यांना ६ कोटी ४१ लाख, साठवण बंधाºयांना २ कोटी ८३ लाख तर उपसा सिंचन प्रकल्पांना १ कोटी ८५ लाख रूपयांचा निधी लागणार आहे.
३८ हजार हेक्टर क्षेत्रातील सिंचन अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:03 PM
तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना निसर्गावरच अवलंबून रहावे लागते. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार करविलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे.
ठळक मुद्देलघु पाटबंधारे खात्याचे प्रकल्प नादुरूस्त : सिंचनाअभावी शेतकरी अडचणीत