शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

रोपवाटिकेत ३.८४ लाख रोपांची निर्मिती

By admin | Published: June 30, 2016 1:49 AM

वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे विविध प्रकारच्या रोपांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात आहे.

फुलली रोपवाटिका : १ जुलैच्या वनमहोत्सवासाठी सज्जअर्जुनी मोरगाव : वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे विविध प्रकारच्या रोपांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात आहे. रोपवाटिकेत उभे असलेले ताजेतवाने रोपे पाहून क्षणभर आपण एखाद्या नंदनवनाशी समरूप झाल्याचा भास होतो. वनविभागाने फुलविलेली रोपवाटिका निश्चितच आल्हादायक ठरणारी आहे. या रोपवाटिकेत ३ लाख ८३ हजार ६०० रोपांचे संवर्धन करण्यात आले आहे.सहा हेक्टरच्या परिसरात असलेली रोपवाटिका आज हिरवीकंच वसुंधरा दिसून येत आहे. ती येत्या १ जुलै रोजी आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी सज्ज असून १ लाख ६६ हजार ५७५ रोप विविध ठिकाणी जाणार आहेत.येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने ७ किमी अंतरावर असलेल्या मालकानपूर येथे मध्यवर्ती रोपवाटिका आहे. सदर रोपवाटिका ६ हेक्टरमध्ये पसरली आहे. अर्जुनी ते महागाव मार्गावरील ऐन रस्त्याजवळ असल्याने ये-जा करणाऱ्यांचे मन प्रफुल्लीत होऊन बहरून जाते. रस्त्यालगतच्या वनसंपदेने खरा निसर्गाचा आस्वाद मनाला हेलावून जातो. मध्यवर्ती रोपवाटिकेची जबाबदारी सांभाळणारे क्षेत्र सहायक के.आर. राठोड यांनी सांगितले की, अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत मालकनपूर येथील मध्यवर्ती रोपवाटिका एकमेव आहे. सहा हेक्टर परिसरात विविध प्रजातींचे स्वत:च बीज संकलन करून रोपांची निर्मिती केली जात असल्याचे सांगितले. रोपवनात सध्या उभी असलेले रोपे जवळपास ५ ते ६ महिन्यांचे आहेत. रोपांची झालेली वाढ पाहता उभे असलेली झाडे सर्वसामान्यांच्या नजरेत भरणारे दिसतात. सदर रोपवाटिकेत विविध रोपांची निर्मिती करून वनविभागासह इतर यंत्रणेला पुरवठा करण्याचे काम आहे. विस्तीर्ण अशा जागेमध्ये आजघडीला सागवन ५९ हजार ८०० रोपे, आवळा ४८ हजार ६००, आंजन ६८ हजार, बांबू ३० हजार, जांभुळ २७ हजार ५००, कडूनिंब १७ हजार, पांढरा शिरस १४ हजार, शिसू १७ हजार, खैर १५ हजार, मोवा १८ हजार, अमलताज २ हजार, बकान १ हजार ५००, बीजा १ हजार ५००, कवट ३ हजार ९००, कुसुम १ हजार ५००, सिंथूर ५००, चिंच १५ हजार, मेकसिंग एक हजार, सीवज ३ हजार, रिठा २ हजार ५००, हिरणडा १ हजार, भेहडा १ हजार, सीताफळ ७ हजार, किनी २ हजार, बेल २६ हजार, करण ३ हजार, तेंदू १ हजार, रोमल ४ हजार, केश १ हजार ५००, बोर २ हजार अशा ३० प्रजातींच्या ३ लाख ८३ हजार ६०० रोपांनी रोपवाटिका फुलली आहे.शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्षारोपण लागवडीसाठी अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात ३० हजार ८००, गोठणगाव २ हजार ५००, सडक अर्जुनी ८३ हजार २७५ व इतर यंत्रणेसाठी ५० हजार रोपांचा पुरवठा करण्यासाठी रोपवाटिका सज्ज झाली आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची उचल करण्याच्या कामाला गती आल्याचे दिसून येत आहे. रोपवाटिका फुलविण्यासाठी जिल्हा उपवनसंरक्षक रामगावकर, प्रोडीसीएफ राहुल पाटील, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी व्ही.जी. उदापुरे, वनपरि क्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात मालकनपूरची मध्यवर्ती रोपवाटिका सजलेली आहे. सध्या सागवान रोपांची निर्मिती करण्यासाठी ५०० बेड तयार करण्यात येत आहेत. सर्वांना रोपे मिळतील, असे क्षेत्रसहायक के.आर. राठोड यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)