गोंदिया : सेवा संस्था, रिदम डांस अॅकेडमीतर्फे उन्हाळी शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, सीमा ढोरे, डॉ. सुवर्णा हुबेकर, सुनील केलनका, सविता तुरकर उपस्थित होते.यावेळी प्रस्तावना सचिव सविता तुरकर यांनी सादर केली. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करुन शिक्षणाला अंगीकारला पाहिजे, बालपणाचा भरपूर आस्वाद घेतला पाहिजे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड म्हणाले. शिबिरात ४० मुले, मुली व काही महिलांनी भाग घेतला. सर्वांना नृत्याचे प्रशिक्षण घेतले. क्राफ्टमध्ये सुंदर वस्तू बनविले. सेवा संस्थाकडून नृत्य शिक्षक शिखा भागडकर व वर्षा पिल्लारे यांना स्मृती चिन्ह देण्यात आले. संस्थाध्यक्ष निलेश देशभ्रतार, उपाध्यक्ष मनिष तिवारी, शिखा भागडकर, दिव्या भगत, कुशल अग्रवाल यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
उन्हाळी शिबिरात ४० विद्यार्थ्यांचा सहभाग
By admin | Published: May 26, 2016 12:45 AM