या रक्तदान शिबिराचे ऑनलाईन विधीवत उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य एम. पी. शेख, नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती रेवेंद्र बिसेन, डाॅ. एल. एस. तुरकर, नीमा संघटनेचे संयोजक डाॅ. हितेश पारधी, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष डाॅ. संगीता देशमुख, नीमाचे सचिव डाॅ. योगेश हरिणखेडे, डाॅ. विजय पालेवार, डाॅ. राहुल बिसेन, डाॅ. सागर पटले, डाॅ. विवेक देशमुख, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, विकास बारेवार, संजय घासले प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरात मंगेश शेंडे, डाॅ. एल. एस. तुरकर, लेखेंद बोपचे, नरेंद्र ठाकूर, विजय हरिणखेडे, युवराज पटले, तपेश टेभंरे, प्रदीप बरईकर, दिनेश शरणागत, प्रणय जैन, मनीष धमगाये, सुरेद्र झंझाड, साकेत पालेवार व इतर ४० हून अधिक रक्तदात्यांनी स्वंयस्फूर्तीने रक्तदान केले. शिबिरासाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, निसर्ग मंडळ, आरोग्य भारती, युवा शक्ती स्पोर्ट क्लब, आर्ट॔ ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी सहकार्य केले.
४० युवकांनी केले रक्तदान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:26 AM