नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यासाठी एका गणवेशासाठी ३०० रूपये असे दोन जोड गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासन देते. परंतु यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला वळती करण्यात आले. परंतु ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचा दुसरा जोड देण्यासाठी आतापर्यंत शासनाने पैसे दिलेच नसल्याची बाब पुढे आली आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी आणि नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाºया व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन जोड गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे अपेक्षीत होते. परंतु शाळा सुरू होऊन महिना होत असताना आतापर्यंत फक्त एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांना वळती करण्यात आले आहेत. त्यातही अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही. गणवेशाच्या दुसºया जोडसाठी रक्कम शासनाकडून शिक्षण विभागाला आलीच नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे देण्यात आले नाही.गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या ४१ हजार ५३६ मुली, अनुसूचित जातीतील चार हजार ५४४ मुले, अनुसूचित जमातीतील सहा हजार ७१९ मुले व दारिद्रय रेषेखालील २२ हजार ४७७ मुले अशा एकूण ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोड गणवेश द्यायचे होते. दोन जोड गणवेशांपैकी एका गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितींच्या खात्यात जमा केल्याचे सर्वशिक्षा अभियानाचे कर्मचारी सांगत आहेत. परंतु अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. गणवेशाचे पैसे मिळाले तर विद्यार्थ्यांना निदान एक गणवेश तरी आतापर्यंत का देण्यात आला नाही. गणवेशाच्या दुसऱ्या जोडसाठी शासनाकडून कार्यवाही करण्यात आली नाही.दोन कोटी २६ लाखांची गरजजिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचा दुसरा जोड देण्यासाठी दोन कोटी २५ लाख ८२ हजार ८०० रूपयांची गरज आहे. एवढा निधी शासनाने पाठविल्याशिवाय दुसरा जोड विद्यार्थ्यांना देता येणार नाही. एका गणवेशामागे ३०० रूपये शासन देत आहे. परंतु तेही गणवेशाची रक्कम शाळा सुरू होऊनही दिली नसल्याने काही ठिकाणचे विद्यार्थी आठवडाभर एकाच गणवेशात शाळेत जातात. तर काही ठिकाणी व्यवस्थापन समित्यांकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलेले नाही.
७५ हजार विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 9:26 PM
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यासाठी एका गणवेशासाठी ३०० रूपये असे दोन जोड गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासन देते. परंतु यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला वळती करण्यात आले.
ठळक मुद्देविद्यार्थी गणवेशापासून वंचित : एकच गणवेशाचे दिले पैसे