शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

४०८ शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:38 PM

शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करते मात्र त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी या योजना फसत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील दोन वर्षांपासून ४०८ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज जोडणी करून देण्यात आली नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनीचे वेळ काढू धोरण : शेतकरी अडचणीत, वीज वितरणच्या कार्यालयात शेतकऱ्यांची पायपीट

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करते मात्र त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी या योजना फसत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील दोन वर्षांपासून ४०८ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज जोडणी करून देण्यात आली नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.महाराष्ट्र शासनाने शेतकºयांना कृषिपंपासाठी अति उच्चदाब वितरण पद्धत सुरू केली. यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने अर्ज मागविले यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले. कंपनीने डिमांड दिल्यानंतर शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी पैशाचा भरणा केला. यानंतर काही झाले किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. सद्या शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत आहे. त्यांच्यावर वरुणराजाची वक्रदृष्टी आहे. पाऊस येत नसल्याने बीज अंकुरलेच नाही काही अंकुरले ते उन्हाच्या कडाक्यामुळे करपत आहेत. पावसाचा थांगपत्ता नाही, महागडे बियाणे विकत घेतले ते वाया जातांना दिसत आहेत. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर कायम आहे. नव्याने बियाणे खरेदी करण्याच्या विवंचनेत सद्या शेतकरी आहे.शेतकरी सदैव आर्थिक विवंचनेत असतो हे भाकित वर्तविण्यासाठी पंडितांची गरज नाही. तो शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तत्पर असतो.अशातच वीज वितरण कंपनीमार्फत उच्चदाब वितरण पद्धत सुरू करण्यात आली.या योजनेत कृषीपंपांना ट्रान्सफार्मरसह वीजजोडणी करून द्यायची होती. कवठा बोळदे येथील कृष्णा लंजे या शेतकऱ्यांने २६ सप्टेंबर २०१७ रोजी ६ हजार २०० रुपयांची डिमांड वीज वितरण कंपनी नवेगावबांध यांचेकडे भरले. आज ना उद्या वीज पुरवठा होईल या अपेक्षेने १ लाख १५ हजार रुपये खर्च करून बोअर व मोटार तसेच ४० हजार रुपये पाईप लाईनवर खर्च केले. मात्र अद्यापही वीज जोडणी करण्यात आली नाही. बोअर केल्यानंतर नेहमी पाणी काढणे सुरूच पाहिजे अन्यथा बोअर बुजण्याची दाट शक्यता असते, हे होऊ नये म्हणून त्यांनी शेताजवळून जाणाऱ्या खांबावरून वीज घेतली. बुधवारी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चोरी पकडली. एकीकडे पैसे भरूनही वीज द्यायची नाही तर दुसरीकडे नुकसान टाळण्यासाठी केलेली चोरी पकडायची हा कुठला न्याय आहे.या पद्धतीने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे धोरण कंपनीने अवलंबिले आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासणारे शासन म्हणून राज्यकर्ते स्व:ताची पाठ स्व:ताच थोपटतात. मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाही. विदर्भाचेच ऊर्जामंत्री आहेत. याबाबत शेतकऱ्यांचा हिताचा काय निर्णय घेतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.सौर कृषी पंप योजना नाममात्रमहाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप योजना आणली. या योजनेसाठी अनेक धान उत्पादक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते मात्र त्यांनाही निसर्गाच्या लहरीपणामुळे उदभवलेल्या या परिस्थितीत लाभ घेता येईल अशी चिन्ह दिसत नाही. कवठा येथीलच लक्ष्मण काशीराम लंजे या शेतकऱ्याने या योजनेअंतर्गत २८ जून रोजी १६ हजार ५६० रुपयांची डिमांड भरली. मात्र अद्याप त्यांच्या शेतात सौर ऊर्जा पंप कार्यान्वित होऊ शकले नाही. त्यांना किती प्रतिक्षा करावी लागते कुणास ठाऊक. यासाठी मात्र शेतकऱ्यांना वारंवार वीज वितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.पैसे भरूनही चोरकृषी पंपाच्या वीज जोडणीचे पैसे भरून दोन वर्ष पूर्ण होत आहेत. आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल याची चौकशी करण्यासाठी कृष्णा लंजे हे नवेगावबांधचे सहाय्यक अभियंता बहाद्दूरे यांचेकडे गेले असता तुम्ही माझेकडे येऊच नका असे उत्तर देऊन त्यांना परतावून लावतात. आपणच पैसे भरायचे व अधिकाऱ्यांकडे चौकशीही करायची नाही हा कुठला न्याय आहे. असा प्रश्न तक्रारकर्त्या शेतकºयांना पडला आहे.जोडणीपूर्वीच अहवालया योजनेअंतर्गत २०१७ पर्यंत डिमांड भरणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीपंपांना वीज जोडणी करणे आवश्यक होते. ही जोडणी पूर्ण झाली असा अहवाल विभागाने शासनाकडे सादर केल्याचे बोलल्या जाते. मात्र अद्यापही प्रत्यक्षात ४०८ कृषीपंपांना वीज जोडणीच झाली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. विज जोडणीची यादी कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे.यापैकी ९३ कृषीपंपांना वीज जोडणीचे काम सुरू आहे. अनेक दिवसापर्यंत ट्रान्सफार्मर उपलब्द्ध नव्हते. वीज खांब उभारण्यात आले होते. आता ट्रान्सफार्मर आले पण पावसाळा सुरू झालात्यामुळे विलंब होत असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज