नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शाळेच्या भौतिक, गुणवत्ता व इतर सर्व उत्थानासाठी असलेल्या ९९९ प्रश्नांचे समाधान करणाऱ्या शाळांनाशाळा सिद्धीमध्ये श्रेणी दिली जाते. या शाळा सिद्धीच्या ‘अ’ श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४१० शाळा आहेत. शाळा सिद्धीच्या ९९९ प्रश्नांमध्ये ९० ते १०० टक्के खºया उतरणाºया या शाळांचा आदर्श इतर शाळांना घेण्याची गरज आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करणे, शाळा डिजीटल करणे, ६ ते १४ वर्षापर्यंत प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी विकसित करणे, प्रत्येक शाळेत स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर देणे, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पनाशक्तीची गती वाढविण्यासाठी, शैक्षणिक साहित्यावर भर देणे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाकडे आकर्षीत करणे, कठिण विषयात विद्यार्थ्यांना रूची निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर करणे या विषयांवर भर देण्यात येते.परंतु शाळा सिद्धी अंतर्गत शाळेतील भौतिक सुविधा, शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांची सुरक्षीतता, शौचालय, स्टडी रूम अशा विविध ९९९ प्रश्नांची प्रश्नावली असते. या ९९९ प्रश्नांच्या प्रश्नावलीत १०० टक्के खºया उतरणाºया गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळांपैकी ४१० शाळा आहेत. या सर्व शाळांना ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे. शाळेचे सामर्थ्यस्त्रोत, अध्यापन, अध्ययन आणि मुल्यांकन, विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास, शिक्षकांची कामगीरी आणि व्यवसाय विकासाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, समावेशन, आरोग्य आणि संरक्षण, उत्पादक समाजाचा सहभाग या ७ क्षेत्रातील ४६ मानकात ९९९ प्रश्न तयार करण्यात आले.त्या प्रश्नाच्या उत्तरात ९० ते १०० टक्के खरे उतरणाऱ्या शाळांना ‘अ’ श्रेणी देण्यात आली. त्यानंतर ८९ ते ८० गुण घेणाऱ्या शाळांना ‘ब’ श्रेणी, ७९ ते ६० टक्के गुण घेणाºया शाळांना ‘क’ श्रेणी, ५९ ते ४० टक्के गुण घेणाºया शाळांना ‘ड’ श्रेणी देण्यात आली आहे. उर्वरीत शाळांची श्रेणी उंचाविण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.‘जिल्ह्यातील शिक्षकांच्या मेहनतीमुळे गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक उठाव क्रांती होत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा जि.प. शाळेतच दाखला करावा यासाठी जि.प. शाळांच्या विशेष उत्थानाकडे लक्ष आहे.-उल्हास नरडशिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. गोंदिया
जिल्ह्यातील ४१० शाळा ‘अ’ श्रेणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:49 AM
शाळेच्या भौतिक, गुणवत्ता व इतर सर्व उत्थानासाठी असलेल्या ९९९ प्रश्नांचे समाधान करणाऱ्या शाळांना शाळा सिद्धीमध्ये श्रेणी दिली जाते. या शाळा सिद्धीच्या ‘अ’ श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४१० शाळा आहेत.
ठळक मुद्देशाळासिद्धी उपक्रम : शाळांची श्रेणी उंचाविण्याकरिता प्रोत्साहन