गोंदिया : जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या कामकाजावर असंतुष्ट होऊन बसलेल्या जिल्हावासीयांनी आपले सरकार या पोर्टलवरून जिल्हा परिषदेच्या तक्रारी केल्या आहेत. एकाच वर्षात जिल्हा परिषदेच्या १६ विभागांतील ४२० तक्रारी आपले सरकार पोर्टलवर करण्यात आल्यात. त्यात सर्वाधिक तक्रारी ग्रामपंचायत विभागाच्या असून सर्वात कमी तक्रारी पशुसंवर्धन विभागाच्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या १६ विभागातील ४२० तक्रारी करण्यात आल्या आहेत. यात सामान्य प्रशासन विभागाच्या १६ तक्रारी होत्या व त्यातील सर्वच तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायत विभागाच्या १०२ तक्रारी होत्या व त्यातील ७५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून २७ तक्रारी प्रलंबित आहेत. वित्त विभागाच्या १२ तक्रारी होत्या व त्यातील ११ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून एक तक्रार प्रलंबित आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या ४८ तक्रारी होत्या व त्यातील सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले. माध्यमिक शिक्षण विभागाच्या ३९ तक्रारी होत्या व त्यातील २९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून १० तक्रार प्रलंबित आहेत. महिला व बाल कल्याण विभागाच्या ११ तक्रारी होत्या व त्यातील १० तक्रारींचे निराकरण करण्यात आले तर एक तक्रार प्रलंबित आहे. आरोग्य विभागाच्या २३ तक्रारी होत्या व त्यातील १८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले व ५ तक्रारी प्रलंबित आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या २४ तक्रारी होत्या त्यातील व १८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले तर ६ तक्रारी प्रलंबित आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या २३ तक्रारी होत्या व त्यातील संपूर्ण तक्रारींचे निराकरण करण्यात आले. बांधकाम विभागाच्या ५६ तक्रारी होत्या व त्यातील ५३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून ३ तक्रारी प्रलंबित आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या ७ तक्रारी होत्या त्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या ३ तक्रारी होत्या त्या संपूर्ण तक्रारींचे निराकरण करण्यात आले. कृषी विभागाच्या १० तक्रारी होत्या त्यातील ८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले तर २ तक्रारी प्रलंबित आहेत. समाज कल्याण विभागाच्या १० तक्रारी होत्या व त्या संपूर्ण तक्रारींचे निराकरण करण्यात आले. नरेगाच्या २१ तक्रारींपैकी २० तक्रारींचा निराकरण करण्यात आले असून १ तक्रार प्रलंबित आहे.