नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पारदर्शक कारभार जनतेसमोर यावा, यासाठी शासनाने सर्व ग्रामपंचायत आॅनलाईन करण्याचे निर्देश केले. प्रत्येक ग्रामपंचायतने केलेले कामे, जन्म, मृत्यूच्या नोंदी व सर्वच माहिती आॅनलाईन करण्याचे निर्देश आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतीपैकी ११८ ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या असून ४२८ ग्रामपंचायत आॅनलाईन पासून दूर आहेत.गोंदिया तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीपैंकी १६ ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या आहेत. तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतीपैंकी ३२ ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या आहेत. आमगाव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीपैंकी ३५ ग्राम पंचायती आॅनलाईन झाल्या आहेत. सालेकसा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीपैंकी २२ ग्राम पंचायती आॅनलाईन झाल्या आहेत. देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीपैंकी २ ग्राम पंचायती आॅनलाईन झाल्या आहेत. गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीपैंकी ४ ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीपैंकी ५ ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैंकी २ ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या आहेत. ग्रामपंचायतमार्फत केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमीतता असते. त्या कामाची माहिती थेट जनतेला होईल. यामुळे धास्तावलेले ग्रामसेवक ग्रामपंचायती आॅनलाईन करीत नसल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत मधील सर्व माहिती आॅनलाईन झाली तर ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येईल. आॅनलाईन ग्रामपंचायत नसल्यामुळे ग्रामपंचायतने कोणती कामे केली कोणती कामे केली नाही. याची माहितीच नागरिकांना नाही. अनेक कामे न करताच बिलाची उचल केली जाते ते बिंग आॅनलाईनमुळे फुटेल. त्यासाठी ग्रामपंचायती आॅनलाईन केली जात नाही. काही ठिकाणी मोबाईल टॉवरच्या अभावामुळे आॅनलाईन करणे शक्य होत नाही परंतु ही संख्या अत्यंत कमी आहे. परंतु बिंग फुटू नये या धास्तीपोटी ग्रामपंचायतीलचा कारभार आॅनलाईन होत नाही.गोंदिया तालुक्यातील ९३ ग्रामपंचायत आॅनलाईन नाही. तिरोडा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत आॅनलाईन नाही. आमगाव तालुक्यातील २२ ग्रामपंचायत आॅनलाईन नाही. सालेकसा तालुक्यातील २० ग्रामपंचायत आॅनलाईन नाही. देवरी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायत आॅनलाईन नाही. गोरेगाव तालुक्यातील ५१ ग्रामपंचायत आॅनलाईन नाही, सडक-अर्जुनी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायत आॅनलाईन नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६८ ग्रामपंचायत आॅनलाईन नाहीत.ग्रा.पं. मध्ये अफरातफरीची ४०५ प्रकरणेगोंदिया जिल्ह्यात ५४६ ग्रामपंचायत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतीपैकी बहुतांश ग्रामपंचायतींनी शासकीय निधीची अफरातफर केल्याचे ४०५ प्रकरणे जिल्हा परिषदेकडे आले आहेत.खासगी व्यक्तींकडूनही लूटशासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी गरिबांना लुटण्याचा प्रकार काही ग्रामसेवकांकडून केला जातो. शौचालयाच्या लाभाचे पैसे किंवा घरकुलाचा लाभ देण्यासाठी गोरगरिबांकडून पैश्याची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकांच्या जाचाला कंटाळून नागरिकांनी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्वाधीन केले. शासकीय निधीची अफरातफर करूनही पैसे कमविण्याचा हव्यास कमी न झालेल्या अनेक ग्रामसेवकांना लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.
४२८ ग्रा.पं. आॅनलाईनपासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 9:46 PM
पारदर्शक कारभार जनतेसमोर यावा, यासाठी शासनाने सर्व ग्रामपंचायत आॅनलाईन करण्याचे निर्देश केले. प्रत्येक ग्रामपंचायतने केलेले कामे, जन्म, मृत्यूच्या नोंदी व सर्वच माहिती आॅनलाईन करण्याचे निर्देश आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतीपैकी ११८ ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या असून ४२८ ग्रामपंचायत आॅनलाईन पासून दूर आहेत.
ठळक मुद्दे११८ ग्रा.पं. झाल्या आॅनलाईन : गैरव्यवहार रोखण्यास होणार मदत