गोंदिया : आई-वडील कामावर गेले भावंडे घरीच असतांना लपंडाव खेळतांना एका ७ वर्षाच्या मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने ४३ वर्षाचा सश्रम कारावास व १२ हजार रूपये दंड ठोठावला. संजय राऊत (२३) ता. जि. गोंदिया असे आरोपीचे नाव आहे. ही सुनावणी १९ डिसेंबर रोजी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी केली आहे.
८ ऑगस्ट २०२० रोजी ६ वर्ष ९ महिन्याची पिडीत मुलगी मोठी बहीन व भावासोबत घरीच होती. पिडित मुलगी शेजारचा मुलीसोबत लपंडाव खेळत असतांना दुपारच्या वेळेला आरोपी संजय राऊत याने पिडितसोबत खेळणाऱ्या मुलींना धमकावून घरी जाण्यास सांगितले. पिडितेला स्वत: घरी नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. यासंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरिक्षक रोहिदास भोर यांनी केला होता. आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी ७ साक्षदारांची साक्ष न्यायालयासामोर नोंदविली. आरोपीचे वकील व अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरूध्द कागदोपत्री पुरावे साक्षदांराचे बयान ग्राहय धरून शिक्षा सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिगंळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार आत्माराम टेंभरे यांनी सहकार्य केले. अशी सुनावली शिक्षाभादंविच्या कलम ३७६ (अ) (ब) अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास, कलम ५०६ अंतर्गत ३ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास २ महिन्याचा अतिरिक्त कारावास, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६ अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास सुनावला आहे. कामाबरोबर लहान मुलांकडेही लक्ष द्या- पारधीया प्रकरणात पिडितेचे वय हे ७ वर्षापेक्षा कमी असून आरोपीचे वय १९ वर्षे होते. आरोपी त्याच गावातील रहिवासी होता. अल्पवयीन चिमुकली तिच्या मैत्रीणी सोबत खेळत असता व कोणताही मोठा व्यक्ती तेथे नव्हते. सर्व गावकरी शेतावर परे रोवणी लावण्यास शेतावर गेले असल्याचा फायदा घेऊन आरोपीने पिडितेवर लैगिंक अत्याचार केला. पालकांनी व इतर गावातील लोकांनी आपले काम करावे परंतु सोबतच लहान मुलांची काळजी घेणे देखील तेवढेच म्हत्वाचे आहे. - कृष्णा डी. पारधी, अतिरिक्त सरकारी वकील, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया.