लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : १ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत कर्तव्य करताना शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व जवान या हुतात्मांना २१ आॅक्टोबरला पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथे सलामी देऊन श्रध्दांजली वाहण्यात आली.या वेळी आयोजित रक्तदान शिबिरात ४३३ जणांनी रक्तदान केले.कार्यक्रमाला प्रमुख म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस अधीक्षक हरिश बैजल, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया (कॅम्प) देवरी संदीप आटोळे यांनी सुध्दा पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. देशात शहिद झालेल्या एकूण ४१९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नावे उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया रमेश बरकते व पोलीस उपअधीक्षक(गृह) सोनाली कदम यांनी वाचवून दाखविली.राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर यांनी शहिद पोलीस स्मृतीदिन सलामीचे नेतृत्व करुन शोक सलामी दिली. हवेत सलामी परेड मधील पोलीस कर्मचाºयांकडून हवेत प्रत्येकी तीन राऊंड फायर करण्यात आले. पोलीस स्मृतिदिनानिमित्त लोक कल्याण कार्यास सहकार्य करण्याकरीता गोंदिया जिल्हा पोलीस विभागातर्फे प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.रक्तदान करणाऱ्यांमध्ये पोलीस अधीक्षक हरीश बैजल, अपर पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, तरुण-तरुणी, नागरिक असे ४३३ जणांनी रक्तदान केले.७० ते ७५ पोलीस अधिकारी-कर्मचारी, तरुण-तरुणी व प्रतिष्ठीत व्यक्ती ऐच्छीक रक्तदान करण्याकरीता रांगेत उभे असताना ब्लड स्टोरेज सेंटर गोंदिया यांच्याकडील रक्तदानाचे बॅग,फार्म व इतर साधन सामुग्री संपल्याने ते रक्तदान करु शकले नाही.भंडारा-गोंदिया जिल्हा पोलीस दलातील ३ अधिकारी व १२ पोलीस कर्मचारी अशा १५ पोलीस अधिकारी-कर्मचारी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद्यांसोबत लढताना शहीद मरण पत्करले. या वेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी पोलीस अधीक्षक बैजल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी महिपालसिंग चांदा, नितीन यादव, प्रशांत ढोले, संतोष गेडाम, कमलाकर घोटेकर, दीपक गेडाम उपस्थित होते.
पोलीस शहीद स्मृतीदिनी ४३३ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 9:43 PM
१ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत कर्तव्य करताना शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व जवान या हुतात्मांना २१ आॅक्टोबरला पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथे सलामी देऊन श्रध्दांजली वाहण्यात आली.
ठळक मुद्देजिल्हा पोलीस प्रशासनाचा पुढाकार : ३ अधिकारी व १२ पोलीस कर्मचारी शहीद