लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चा पेपर रविवारी (दि.१९) जिल्ह्यातील २० केंद्रांवरून घेण्यात आला. इंग्रजी, मराठी, उर्दू, बंगाली, हिंदी, सिंधी, गुजराती, कन्नड व तेलगू अशा नऊ माध्यमांतून टीईटीचा पेपर घेण्यात आला आहे.पहिला पेपर १२ केंद्रांवरून घेण्यात आला असून यात दोन हजार ९०० परीक्षार्थी पात्र होते. त्यातील दोन हजार ६१५ जणांनी परीक्षा दिली असून २८५ परीक्षार्थी गैरहजर होते. दुसरा पेपर आठ केंद्रांवरून घेण्यात आला व त्यात एक हजार ८५१ परीक्षार्थी पात्र होते. यातील एक हजार ७२४ जणांनी परीक्षा दिली असून १२७ परीक्षार्थी गैरहजर होते. असे दोन्ही पेपर चार हजार ७५१ परीक्षार्थीं पैकी चार हजार ३३९ परीक्षार्थींंनी दिले असून ४१२ विद्यार्थी गैरहजर होते.शहरात जे.एम.हायस्कूल सिव्हील लाईन्स, मनोहर म्युनिसीपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राजस्थान कन्या हायस्कूल, मनोहर म्युनिसीपल हायर सेकंडरी स्कूल, बी.एन.आदर्श सिंधी हायस्कूल, एस.एस.गर्ल्स हायस्कूल, महावीर मारवाडी हायस्कूल, एस.एस.गर्ल्स ज्युनिअर कॉलेज, बी.एच.जे.कॉलेज, जे.एम.हायस्कूल (मुख्य), रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, निर्मल इंग्लीश स्कूल, श्रीमती सरस्वतीबाई महिला विद्यालय व गुजराती राष्ट्रीय हायस्कूल असे १४ परीक्षा केंद्र होते. पहिल्या पेपरचे १२ केंद्र तर दुसऱ्या पेपरचे आठ केंद्र होते.परीक्षेच्या वेळी ऑनलाईन अर्जात जे माध्यम नोंदविले होते ते माध्यम विद्यार्थ्यांना मिळाले. उत्तर पत्रीका ए,बी, सी,डी असे असून १५० गुणांना १५० प्रश्न होते. उत्तरासाठी बहुपर्याय होते त्यातील एक उत्तर होते. एका वर्गात २४ परीक्षार्थी बसण्याची सोय करण्यात आली होती. केंद्र संचालक व झोनल ऑफिसरच्या नियुक्ता करण्यात आल्या होत्या.२० केंद्रांसाठी पाच झोन तयार करण्यात आले होते. पेपर-१ करीता १२ केंद्र असून त्यासाठी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजताची वेळ होती. पेपर-२ करीता आठ केंद्र असून दुपारी २ ते ४.३० वाजताची वेळ होती. ४० टक्के दिव्यांग असल्याचे ज्यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचे पत्र होते त्याला शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रमाणीत करून लेखनीक करीता अधिकचा वेळ देण्यात आला होता. टीईटीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिीकारी आर.पी. रामटेके, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व सर्व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.वेळेत न पोहचल्याने पेपर देता आला नाहीपरीक्षार्थ्यांनी दिलेल्या वेळेच्या अर्धा तास पूर्वी म्हणजेच १० वाजता परीक्षा केंद्रावर पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु या सूचनांचे काहींनी पालन न केल्यामुळे त्यांना टीईटीचा पेपर देता आला नाही. सकाळी १०.१० वाजता पोहचणाऱ्यांनाही परीक्षा केंद्रात प्रवेश न दिल्यामुळे काही वेळ परीक्षार्थ्यांनी बाहेर ओरड केली. परंतु चूक आपलीच आहे हे लक्षात आले असता ते परीक्षा केंद्रावरून घरी परतले. अनेक केंद्रांवर हा प्रकार बघायला मिळाला.
४३३९ जणांनी दिली टीईटीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 6:00 AM
पहिला पेपर १२ केंद्रांवरून घेण्यात आला असून यात दोन हजार ९०० परीक्षार्थी पात्र होते. त्यातील दोन हजार ६१५ जणांनी परीक्षा दिली असून २८५ परीक्षार्थी गैरहजर होते. दुसरा पेपर आठ केंद्रांवरून घेण्यात आला व त्यात एक हजार ८५१ परीक्षार्थी पात्र होते. यातील एक हजार ७२४ जणांनी परीक्षा दिली असून १२७ परीक्षार्थी गैरहजर होते.
ठळक मुद्दे४१२ परीक्षार्थी गैरहजर : वेळेत न पोहचल्याचा अनेकांना फटका