शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

४४ लाख बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 9:38 PM

पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर ४४ लाख ५६ हजार ३६६ उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ऐवढे बेरोजगार राज्यात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे असे म्हटल्यास वागवे होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर ४४ लाख ५६ हजार ३६६ उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ऐवढे बेरोजगार राज्यात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे असे म्हटल्यास वागवे होणार नाही.पूर्वी सुशिक्षित बेरोजगार जिल्हा स्वंयरोजगार केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी रांगेत लागावे लागत होते. मात्र आता या केंद्राचे नाव आणि प्रणालीत बदल झाला आहे. या केंद्राचे नाव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे झाले आहे. या केंद्रावर या माध्यमातून रोजगार देण्याचे काम केले जात नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र यानंतरही मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी मोठ्या अपेक्षेने करतात. राज्यातील या ३५ केंद्रातील आकडेवारीवर नजर टाकल्यास नाव नोदंणी केलेल्या बेरोजगारांची संख्या ४४ लाख ५६ हजार ३६६ ऐवढी आहे. हा केवळ नोंदणीकृत आकडा असून राज्यात बेरोजगारांची संख्या अधिक असल्याचे बोलल्या जाते. या केंद्राच्या माध्यमातून कुठलाच रोजगार प्राप्त होणार नसल्याने येथे नोंदणी करण्याचा कुठलाच फायदा नाही असे मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्हास्तरावर नोंदणी झालेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक बेरोजगारांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे.पुणे जिल्हा ३ लाख ७२ हजार ०७३, नागपूर २ लाख ३४ हजार ६०६, औरगांबाद २ लाख ३५ हजार २८८, ठाणे २ लाख ४४ हजार ९९१, मुंबई २ लाख १६ हजार ७०३, नाशिक २ लाख २६ हजार ८१०, मुंबई शहर १ लाख ९ हजार ८०८, जळगाव १ लाख ८३ हजार ४४३, अहमदनगर १ लाख ६८ हजार ५०८, नांदेड १ लाख ५ हजार ८५६, बीड १ लाख ९ हजार ८०८, लातूर १ लाख १४ हजार ९१६, सोलापूर १ लाख ७० हजार ५९५, सातारा १ लाख १९ हजार ६९८, कोल्हापूर १ लाख ८५ हजार ९०१, सांगली १ लाख ३३ हजार ९७९ बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे.४९ हजार युवकांना रोजगाराचा दावाकौशल्य विकास, रोेजगार व उद्योजकाता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून राज्यातील आत्तापर्यंत ४९ हजार ७९६ बेरोजगारांना रोजगार मिळाल्याची दावा केला आहे. विविध कंपन्यामध्ये जॉब प्लेसमेंट अंतर्गंत १८ हजार ७७३ पदे भरण्यात आली आहे. वर्धा १५९, नागपुर ७८३, भंडारा ७, गडचिरोली १ व चंद्रपूर २३ तर गोंदिया जिल्ह्यातील एकाही युवकाला रोजगार मिळाला नाही.