आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा प्रशासनातर्फे मागील काही दिवसांपासून सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला जात आहे. मनरेगाच्या कामात जिल्ह्यातच नव्हे तर देशात आघाडी घेतल्याचे आठ दिवसांपूर्वी सांगण्यात आले. मात्र जिल्ह्यातील एकूण ५४६ ग्रामपंचायतपैकी केवळ ९८ ग्रा. पं. अंतर्गत मनरेगाची कामे सुरू असल्याची बाब पुढे आली आहे.अत्यल्प पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला. तर रब्बीतील पिकांना गारपीट आणि वादळी पावसाचा तडाखा बसला. परिणामी शेतकºयांच्या हाताला काम नाही. मजुरांना रोजगारासाठी भटकावे लागू नये, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कामे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतींना कामांची यादी व प्रस्ताव मागविले आहे. जिल्ह्यात एकूण ५४८ ग्रामपंचायत असून यापैकी ९८ ग्रामपंचायत अंतर्गंत मनरेगाचीे ३६० कामे सुरू असून या कामांवर ६६ हजार ८४३ मजूर कार्यरत असल्याची माहिती आहे. तर उर्वरित ४४८ ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगाची कामे सुरूच करण्यात आली नाही. त्यामुळे या गावातील मजुरांना रोजगाराच्या शोधात शहराकडे भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.मनरेगाची कामे राबविण्यात जिल्ह्यातील दोन ते तीन तालुके माघारल्याची माहिती आहे. एकीकडे गारपीट व वादळी पावसामुळे शेतीची कामे ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला कामे नाहीत. त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनाकडून मनरेगाची कामे आणि सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मनरेगाची याशिवाय नेमकी पुन्हा कुठे कामे सुरू आहेत. असा सवाल उपस्थित केला जात आहे. गावा गावातील नेते व गावकरी मनरेगाची कामे सुरू करुन रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी संबंधित यंत्रणेला करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
४४८ ग्रामपंचायतींना मनरेगाच्या कामांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:49 PM
जिल्हा प्रशासनातर्फे मागील काही दिवसांपासून सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला जात आहे.
ठळक मुद्देरोजगारांची कामाच्या शोधात भटकंती : केवळ ९८ ग्रा.पं.मध्ये मनरेगाची कामे