शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार वीज बिल माफ योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 5:30 PM

अर्थसंकल्पात घोषणा : कृषीपंपधारक शेतकऱ्यांना होणार मदत; ४३४ कोटी रुपयांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. २८) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या. यात सर्व कृषीपंपधारक शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली. याचा लाभ जिल्ह्यातील ४५ हजार ३२६ कृषीपंपधारक शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित असून, धान हे मुख्य पीक आहे. शेतकरी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात धानाची लागवड करतात. धानाला पाणी भरपूर लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात विहिरी खोदून त्यावर मोटारपंप लावले आहेत. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटाला तोंड देत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे वीज बिल थकले होते. त्यामुळे थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून तगादा लावला जात होता. यामुळे शेतकरी संकटात आले होते. जिल्ह्यातील ४५ हजार ३२६ शेतकऱ्यांकडे ४३४ कोटी ८३ लाख २१ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. याचा लाभ जिल्ह्यातील या ४५ हजार शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषीपंपधारक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शेतीचे पंचनामे होणार आता जलदगतीनेनैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे होण्यास पूर्वी बराच विलंब लागत होता. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, नुकसानीचे ई पंचनामे करण्यात येणार असल्याने जलदगतीने पंचनामे होऊन नुकसानभरपाई त्वरित मिळण्यास मदत होणार आहे.

संजय निराधार योजनेचे अनुदान आता दीड हजार रुपयेअर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा दीड हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. पूर्वी १ हजार रुपये अनुदान दिले जात होते. याचा लाभ जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या ४२ हजार ८१४ लाभार्थ्यांना मिळणार आहे.

४२ हजार शेतकऱ्यांचे झाले होते नुकसानजिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ४७ हजार २४४ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याने ४२ हजार शेतकरी बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना सुरुवातीला दोन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने नुकसानभरपाईची मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढविली होती. कृषी विभागाने नोव्हेंबरमधील नुकसानभरपाईसाठी ३६ कोटी २० लाख आणि डिसेंबरमधील नुकसानभरपाईसाठी ३२ कोटी ६३ लाख अशा प्रकारे एकूण ६९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. आता अर्थसंकल्पातसुद्धा यासाठीची घोषणा करण्यात आली.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीBudgetअर्थसंकल्प 2024Ajit Pawarअजित पवार