लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : इमारत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून वर्षभरात ४५ हजार पेक्षा जास्त कामगारांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करविली आहे. अचानकच एवढ्या मोठ्या संख्येत वाढ झाल्याने आश्चर्य व संशयही व्यक्त केला जात आहे.शासनाकडून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व अन्य निर्माणकार्य कामगार कल्याणकारी मंडळात केली जाते. मागील वर्षी यात फक्त ८ हजार कामगारांची नोंद करण्यात आली होती. मात्र यंदा ४५ हजार पेक्षा जास्त कामगारांची नोंद करण्यात आली आहे. अचानक एवढ्या मोठ्या संख्येत कामगारांची नोंद वाढल्याने अश्चर्य व शंका व्यक्त केली जात आहे.४ जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम करणाऱ्या मजुरांची विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली. यांतर्गत २२ हजार ४९१ मजुरांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर मात्र नोंदणीकडे त्यांचा कल वाढत गेला असून सहायक कामगार आयुक्त कार्यालयात आठवड्यातील पहिले तीन दिवस मजुरांची नोंदणीसाठी चांगलीच गर्दी दिसून येते.नोंदणीसाठी कोणत्याही कंत्राटदाराकडे ९० दिवस इमारत बांधकामासाठी काम केल्याचे प्रमाणपत्र कामगाराला सादर करावे लागते. मात्र या योजनेंतर्गत फक्त ४ कंत्राटदारांनी नोंदणी करविल्याची माहिती आहे.वास्तवीक, १० लाखांपेक्षा जास्तीचे काम करणाऱ्या १० मजुरांना काम देणाऱ्या कंत्राटदारांचीच या योजनेत नोंदणी होते. मात्र बहुतांश कंत्राटदार फक्त ७-८ मजुरांनाच काम दिल्याचे सांगत असून नोंदणीपासून सुटतात.परिणामी कित्येक मजुरांना कंत्राटदारांकडून मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध करवून देण्याची जबाबदारी शासनावर येते. अशात अचानक एका वर्षातच शासनाला नोंदणी झालेल्या मजुरांवर लाखो रूपये खर्च करावे लागणार आहेत. याचे परिणाम येत्या १-२ वर्षांत बघावयास मिळतील. अशात याची चौकशी करण्याची गरज दिसून येत आहे.कामगारांना असा मिळणार लाभनोंदणी होताच कामगार ५ हजार रूपयांची आर्थिक मदत मिळविण्याचे हकदार बनतात. अशात या ४५ हजार कामगारांपैकी सुमारे ४० हजार कामगार या रकमेचे हकदार बनले आहेत. ही रक्कम त्यांना कुदाळ, फावडा, घमेले विकत घेण्याच्या नावावर दिली जाते. शिवाय, कामगारांच्या अपत्यांना शिष्यवृत्ती, कामगार किंवा त्याच्या अपत्यांच्या विवाहासाठी ३० हजार रूपये, गंभीर आजारावर १ लाख रूपये, मृत्यू झाल्यास अंतीम संस्कारासाठी १० हजार रूपये, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २५ हजार रूपये ५ वर्षांपर्यंत, कामगाराचा मृत्यू कामादरम्यान झाल्यास ५ लाख रूपये व मृत्यू नैसर्गिक असल्यास २ लाख रूपयांची आर्थिक मदत दिली जाते.
४५ हजार कामगारांनी केली नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 9:42 PM
इमारत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून वर्षभरात ४५ हजार पेक्षा जास्त कामगारांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करविली आहे. अचानकच एवढ्या मोठ्या संख्येत वाढ झाल्याने आश्चर्य व संशयही व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देअचानकच झाली वाढ : चौकशी करण्याची गरज