ऑनलाईन लोकमतपरसवाडा : ‘गुड मॉर्निंग’ पथकाने मुरपार या गावात आकस्कि भेट देऊन उघड्यावर शौच करणाऱ्या प्रत्येकी एक हजार रूपये प्रमाणे चार हजार ८०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे ‘गुड मॉर्निंग’ पथकाच्या नावाने गावात दहशत पसरली आहे.खंड विकास अधिकारी जावेद इनामदार यांनी अपल्या ‘गुड मॉर्निंग’ पथकासह मुरपार या गावात पहाटेच भेट दिली. या भेटीत त्यांना गावातील चार व्यक्ती उघड्यावर शौच करीत असताना आढळले. यावर पथकाने या चौघांना प्रत्येकी एक हजार २०० रूपये प्रमाणे पावती फाडून दंड ठोठावला. एवढेच नव्हे तर त्यांना सर्व नागरिकांसमोर शपथ देऊन सोडण्यात आले.उघड्यावर शौचाला जाऊ नका याबाबत ‘गुड मॉर्निंग’ पथकच काय देशपातळीवर जनजागृती केली जात आहे. एवढेच नव्हे तर उघड्यावरील शौचावर आळा घालण्यासाठी शौचालय बांधकामासाठी विशेष योजना शासन राबवित आहे. मात्र त्याचा काहीच परिणाम होत असताना दिसत नाही. मात्र ‘गुड मॉर्निंग’ पथकाने केलेल्या या कारवाईनंतर मुरपारवासीयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौघांना ४८०० रूपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:36 PM
‘गुड मॉर्निंग’ पथकाने मुरपार या गावात आकस्कि भेट देऊन उघड्यावर शौच करणाऱ्या प्रत्येकी एक हजार रूपये प्रमाणे चार हजार ८०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.
ठळक मुद्देगुड मॉर्निंग पथकाची कारवाई : मुरपार गावात दिली धडक