नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोड गणवेश देण्याची योजना सुरू करण्यात आली. यंदापासून गणवेशाची रक्कम विद्यार्थी व त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. २७ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त २८ हजार ६१० विद्यार्थ्यांनीच गणवेश घेतले. तर अजूनही ४८ हजार ७७२ विद्यार्थी गणवेशाविनाच आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, त्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी व श्रीमंत-गरीब असा भेदभाव नष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची योजना शासनाने सुरू केली. शाळेत सर्व विद्यार्थी गणवेशात यावे यासाठी शासनाने वर्षातून दोन गणवेश विद्यार्थ्यांना देण्याचा पायंडा रचला. वर्ग १ ते ८ च्या सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश देण्याचे नियम तयार केले.विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी त्या गणवेशाची रक्कम त्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत होती. मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष मिळून त्या गणवेशाची खरेदी करायचे. एका गणवेशासाठी २०० रूपये असे दोन गणवेशासाठी ४०० रूपये एका विद्यार्थ्याच्या मागे शाळेला मिळत होते. परंतु या गणवेशातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या झळकत असल्याने ही बाब शासनाच्या लक्षात आली. गणवेशाची रक्कम सर्व शिक्षा अभियानाकडून शाळा समितीलाच देण्यात येणार आहे.सन २०१७-१८ या सत्रातील ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यासाठी ३ कोटी ९ लाख ५२ हजार ८०० रूपये शासनाने उशीरा का होईना दिले. यंदा शासनाने गणवेशाची व्यवस्था पालकांनीच करावी असे ठरविले. गणवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आई किंवा पालकांसह असलेल्या संयुक्त खात्यात गणवेशाचे ४०० रूपये टाकले जात आहेत. गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ च्या ४२ हजार ५८५ मुली, अनुसूचित जातीच्या ४ हजार ७७९ मुले, अनुसूचित जमातीचे ६ हजार ६६५ मुले व दारिद्रय रेषेखालील २३ हजार ३५३ मुले असे एकूण ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोडी गणवेश सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी द्यायचे आहेत. मात्र आता शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही जिल्ह्यातील ४८ हजार ७७२ विद्यार्थी गणवेशापासून वंचीत आहेत.
४९ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 10:18 PM
प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोड गणवेश देण्याची योजना सुरू करण्यात आली.
ठळक मुद्दे२९ हजार विद्यार्थ्यांना लाभ : अडीच महिने लोटूनही ७० टक्के विद्यार्थी गणवेशाविनाच