देवरी : तालुक्यातील ग्राम डोंगरगाव डेपो येथे जुगार खेळणाऱ्या पाच जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून एक लाख ८८ हजार ३० रुपयांचा माल जप्त केला.
पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी रविवारी (दि. १२) डोंगरगाव डेपो येथे शेतशिवारात असलेल्या अनिल बाबुराव कुलभजे यांच्या शेतातील झोपडीत धाड घातली असता तेथे त्यांना हेमंत तरोणे (४३), आत्माराम शिवणकर (५२), घनश्याम मेश्राम (४५), अनिल कुलभजे (४३), अशोक ढोमणे (४१, रा. बाह्मणी) व एक इतर इसम जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले. घटनास्थळी त्यांना फडावर एक हजार ५१० रूपये, झडतीत एक हजार ५०० रूपये, १५ हजार रूपये किमतीचे २ मोबाइल, एक लाख ७० हजार रूपये किमतीच्या ४ मोटारसायकल असा एकूण एक लाख ८८ हजार ३० रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. फिर्यादी पोलीस नायक रामचंद चौधरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १२ (अ) मजुका अन्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई ठाणेदार सिंगनजुडे, पोलीस नायक परसमोडे, चौधरी, शिपाई डोहळे, धर्मे, नेवारे, बोपचे यांनी केली आहे.