लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गरजू मुलींना सायकल खरेदीकरिता देण्यास येणाऱ्या अनुदानात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मुलींना सायकल खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. ते आता ३५०० एवढे करण्यात आल्याचे नियोजन विभागाच्या २३ मार्चच्या परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.राज्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील २३ जिल्ह्यातील १२५ अतिमागास तालुक्यात राबविल्या जाणाºया इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ किमी अंतरापर्यंत राहणाºया गरजू मुलींना सायकल खरेदीकरिता अनुदान दिला जातो. त्या अनुदानात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तीन हजार रूपयांवरून ते आता ३५०० एवढे करण्यात आले आहे.मानव विकास कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीच्या जुलै २०१७ च्या बैठकीत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाºया मुलींना सायकल वाटप योजनेंतर्गत सायकली खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदानात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती. पूर्वी सायकल खरेदीसाठी देण्यात येणारे तीन हजार रूपये पुरेसे नव्हेते. मुलींना सायकली खरेदीकरिता ५०० ते १००० रुपये जवळचे घालावे लागत होते.सायकलीच्या किमती ३५०० ते ४५०० रुपयांच्या घरात आहेत. यंदा ५०० रुपयांची वाढ केल्याने जवळचे पैसे देण्यास गरीब पालकांनाही आता जड जाणार नाही.सत्र २०१८- २०१९ मध्ये ही वाढ करण्यात आली आहे. एप्रिल उजाडले तरीपण अर्जुनी-मोरगाव तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत सायकल खरेदीचे अनुदान अद्यापही शाळांना देण्यात आले नाही, हे विशेष.
सायकल खरेदीसाठी अनुदानात ५०० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 10:19 PM
गरजू मुलींना सायकल खरेदीकरिता देण्यास येणाऱ्या अनुदानात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मुलींना सायकल खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान देण्यात येत होते.
ठळक मुद्देमानव विकास कार्यक्रम : सायकल खरेदीचे अनुदान अद्यापही नाही