गोंदिया : आधार महिला संघटना, लायन्स क्लब, वामा सुरक्षा दल व जेसीआय यांच्या संयुक्तवतीने सुभाष बागेत सोमवारी जागर मंगळागौरीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ५०० महिलांनी हजेरी लावली होती.नागपूरचे आनंदी ग्रुप टीव्ही फेमच्या महिला कलाकारांनी घागरी फुकणे, विंचू चावला, फुगडी, आकर्षक सामूहिक नृत्य, उखाने इत्यादी द्वारे भरपूर मनोरंजन केले. विशेष म्हणजे याप्रसंगी आनंदी ग्रुपच्या अंजली देशपांडे व त्यांच्या १५ महिला कलाकारांचा शाल, श्रीफल, स्मृतीचीन्ह देवून सत्कार करण्यात आला. संचालन सुजाता बहेकार, सिमा बैतुले व लता बाजपेई यांनी केले. आभार संघटनेच्या संयोजिका भावना कदम यांनी मानले. कार्यक्रमात सविता अग्रवाल, छाया दसरे, सविता पुराम, सीता रहांगडाले, द्वारका सावंत, भारती धोटे, चित्रा जोशी, निला डोके, अंकिता शमार, वडेकर, भावना राजनकर, जाफरी, झोरे, तरासे, कनोजिया, निता क्षत्रिय, सुजाता बहेकार, पूजा तिवारी, मंजूषा कार्लेकर, लता बाजपेई, सिमा बैतुले, श्रुती केकत, कृपा कदम, अनिता चौरावार, पूनम अरोरा, कश्मिरा संघानी, आशा पाटील, शैलजा सोनवाने, रामटेककर, सुनिता धर्मशहारे, दिपा काशिवार, माया राघवते, वैशाली गिरीपुंजे, कृतिका सेट, प्रज्ञा मेहता, प्रांजली बोरकुटे, कुंदा दोनोडे, रिता यादव, युगला सावंत, शिवानी चव्हाण, वंदना घाटे, संध्या कटरे, डिंपल कुंभलवार, रेखा भरने, निवृत्ती तुरकर, हर्षा येरणे, कंचन भोयर, सुवर्णा कदम, योजना कोतवाल, उमा महाजन, अश्वीनी केंदरे, ममता जैन, शालीनी डोंगरे, मैथुला बिसेन, प्रमिला सिंद्रामे, सुनिता हेमने, स्मिता दखने, प्रणिता कुलकर्णी, मनिषा शिंदे, हर्षा निमकर उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
मंगळागौरीच्या जागरमध्ये ५०० महिला सहभागी
By admin | Published: September 24, 2016 1:57 AM