शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

खूनाचा प्रयत्न करणाऱ्या ५३ जणांवर गुन्हा दाखल

By admin | Published: September 22, 2016 12:39 AM

ट्रकमध्ये जनावरे डांबून त्यांना कत्तलखान्यात नेणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर चंगेरा येथील ५३ जणांनी दगडफेक केली.

शासकीय अडथळ्यात एमसीआर : खुनाच्या प्रयत्नात १२ जणांना अटकगोंदिया : ट्रकमध्ये जनावरे डांबून त्यांना कत्तलखान्यात नेणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर चंगेरा येथील ५३ जणांनी दगडफेक केली. त्या लोकांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारच्या पहाटे ३ वाजता कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना पकडण्यासाठी गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते आपल्या स्टॉप व रावणवाडी पोलिसांना घेऊन कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर चंगेरा येथील ५३ लोकांनी दगड, काठ्या, राड, तलवार व चाकू घेऊन हल्ला चढविला. पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. पोलिसांना माहिती पुरविता म्हणून बाबू नावाच्या इसमाच्या घरावर हल्ला चढजवण्यात आला. यात बाबूची आई मकबुलबी रफीक खान (५२) रा. चंगेरा यांना राडने मारून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्यात उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी माधव केंद्रे, संदीप बल्लारी व रावणवाडीचे माधव केंद्रे हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणात आरोपी इमरान रहिमान शेख, मो. वसीम नाजर खान, राजीक जलील खान, खलील रशीद खान, मोहीम सलीम खान, इरशाद मीसार खान,आबीद हिदायत खान, सुभान सलाम खान, मुस्ताक राज खान, जलील रसीद खान, आशिफ रसीद खान, वसीम सलीम, मुनीर रसीन खान व इतर ४० लोकांवर कलम ३०७, ३५४, २९४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात १२ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने एमसीआर दिला. परंतु पुन्हा ३०७ या कलमांतर्गत आरोपींना ताब्यात घेतले. (तालुका प्रतिनिधी)१२ जणांनी फोडले वाहनया प्रकरणात बोलिसांच्या एमएच ३५ डी १९१ या वाहनावर दगडफेक करून वाहनाचे २० हजाराचे नुकसान केले. या प्रकरणातील १२ आरोपींवर भादंविच्या कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४८,१४९, ४२७, सहकलम ११ (१) (ड), प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ५ (अ), ५ (ब), ६, ९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.