अनेक ठिकाणी मजूर रिकामे : देवरी तालुक्यात ग्रा.पं.चे एकही काम नाहीगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामात नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्यातील फक्त ५३.४८ मजुरांकडे आधार कार्ड आहे. जवळच्या भंडारा जिल्ह्यात ६३.५० टक्के मजुरांनी आधार कार्ड बनविले असताना यात गोंदिया मागे पडला आहे.रोहयोसाठी जिल्ह्यात सहा लाख १७ हजार ७०९ मजुरांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख ३० हजार ३५२ लोकांकडे आधार कार्ड आहे. दोन लाख ३३ हजार ३५२ आधार कार्डाची तपासणी करण्यात आली. दोन लाख ८७ हजार ३५७ मजुरांना आधार कार्ड मिळाले नाही. नागपूर विभागात प्रथम असलेल्या भंडारा जिल्ह्यात ५ लाख ७१ हजार ८०० मजूरांनी नोंदणी केली होती. यातील तीन लाख ६३ हजार ६५ लोकांकडे आधारकार्ड आहेत. दोन लाख ७१ हजार ४७६ आधारकार्डची तपासणी करण्यात आली तर दोन लाख आठ हजार ७३५ लोकांकडे आधारकार्ड नाहीत. गडचिरोली जिल्ह्यात पाच लाख ७२ हजार ७ मजुरांनी नोंदणी केली होती. त्यातील २ लाख ८३ हजार ४५१ लोकांकडे आधार कार्ड आहेत. यातील एक लाख ७४ हजार ७५२ मजुरांच्या आधारकार्डांची तपासणी करण्यात आली. परंतु दोन लाख ८८ हजार ५५६ मजुरांकडे आधार कार्ड नाहीत. नागपूर जिल्ह्यात सर्वात कमी मजुरांकडे आधार कार्ड आहेत. तीन लाख ३३ हजार २२९ मजूरांनी नोंदणी केली, त्यापैकी १ लाख २७ हजार ९२३ मजुरांकडे आधार कार्ड आहे. यातील ९७ हजार ८७७ आधारकार्डची तपासणी करण्यात आली. तर दोन लाख पाच हजार ३०६ मजुरांकडे आधार कार्ड नाही. (तालुका प्रतिनिधी)
५३.४८ टक्के मजूर विना‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2016 2:02 AM