स्थानिक एसएसजे महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराची सुरुवात भगवान शंकर यांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. या दिनाचे औचित्य साधून स्थानिक मोक्षधामात आयोजकांनी वृक्षारोपण केले. रक्तदान शिबिराचे आयोजन माहेश्वरी समाज संघटना, राजपूत क्षत्रिय समाज संघटना, राज्य पत्रकार संघ, कोहळी समाज, संघटना व्यापारी संघटना, तालुका वैद्यकीय संघटना, कुणबी समाज संघटना, कलार समाज संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, अर्जुनी मोरगाव तथा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांनी आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे रक्तदान शिबिर यशस्वी केले. गोंदियाच्या बाई गंगाबाई रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. पल्लवी गेडाम, प्रयोगशाळा तज्ज्ञ अमित ठवरे, परिचारिका सृष्टी मुरकुटे आणि चमूने रक्तसंकलनाचे कार्य केले. शिबिरासाठी डॉ. राजेश चांडक, डॉ. उल्हास गाडेगोने, डॉ. भारत लाडे, रमण चांडक, पप्पू लड्डा, मदन चांडक, कमल भूतडा, भगवानदास पणपालिया, शिक्षक उमेश कापगते, संजय बडोले, पंकज मिश्रा यांनी सहकार्य केले.
===Photopath===
190621\1957228-img-20210619-wa0020.jpg
===Caption===
रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरण करतांना,बाजूला रक्तदान करताना रक्तदाते