नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रेमाच्या आमिषाला बळी पडलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेकडो मुली सैराट झाल्या होत्या. ज्या तरूणासोबत सुखी संसार करण्याचे स्वप्न त्या मुलींनी रंगविले होते ते स्वप्न पळून गेल्यानंतर काही दिवसांतच धुळीस मिळाले. अखेर प्रेमभंग झालेल्या त्या ५५ मुली गोंदिया पोलिसांच्या मदतीने आपल्या आई-वडिलांकडे परतल्या आहेत.सैराट या सिनेमाने धुमच केली होती. त्या चित्रपटातून समाजातील वास्तव स्थितीचे जिवंत चित्रण समाजापुढे मांडण्यात आले. परंतु आपले जीवन उद्ध्वस्त होऊ शकते असा अर्थबोध घेण्यापेक्षा त्या सिनेमातील नायक-नायीका पळून जाते म्हणून आपणही पळून जाऊ असा चुकीचा अर्थ काढणाऱ्या शेकडो मुली मागील तीन वर्षात पळून गेल्या होत्या. पळून गेलेल्या गोंदिया जिल्ह्यातील १८ वर्षाखालील ५५ मुलींना मागील ५ आॅपरेशन मुस्कानच्या माध्यमातून घरी आणण्यात आले.आई-वडील मुला-मुलींना आदर्श नागरिक घडविण्याचे स्वप्न रंगवत असताना त्यांनी आई-वडिलांच्या आशेवर पाणी फेरून आपल्या प्रियकरासोबत पलायन केले. सर्वच साधने सहजरित्या उपलब्ध झाल्याने आता कोवळ्या वयातच प्रेमाचे आकर्षण अनेक मुला-मुलींंना वाटू लागते. शिक्षण घेणाºया मुला-मुलींकडे मोबाईल दिला जातो. त्यामुळे ते मोबाईलच्या माध्यमातून सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात. मोबाईलचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करण्याच्या हेतूने आई-वडील त्यांना मोबाईल देतात. परंतु त्याच्या विपरीत जाऊन आपले प्रेम फुलविण्यासाठी या मोबाईलचा अधिक वापर होत आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रेमाचे आमिष देत तरूणींचे लैंगीक शोषण करण्याचेही प्रमाण मोठे आहे.अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून प्रेमाच्या नाट्यातून त्यांचे लैंगिक शोषण करणारे कमी नाही. वर्ष दोन वर्ष प्रेमाच्या आणाभाका केल्यावर त्या मुलींना वाºयावर सोडण्याचेही प्रकार जिल्ह्यात झाले आहेत.शिकवणीला जाण्याच्या नावावर पसारगोंदिया जिल्ह्यातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींची माहिती घेतली असता सर्वात जास्त मुली गोंदिया शहरातून पळून गेल्या आहेत. गोंदिया शहरातून ज्या मुली पळून गेल्या त्यातील बहुतांश मुली शिकवणी वर्गाच्या नावावर घरातून बाहेर पडल्या होत्या. शिकवणी वर्गासाठी जाणाºया मुली प्रियकरासोबत दररोज सायंकाळी किंवा सकाळीच भेटून आपल्या प्रेमकहाणीचा पुढचा पाढा शिकवणी वर्गाच्या नावावरच गात असतात. आईवडीलांनी या प्रकाराकडे लक्ष घालणे आवश्यक आहे.पालक तक्रारही करीत नाहीतपोलिसांनी ५ वेळा आॅपरेशन मुस्कान राबविले. यावर नजर टाकली असता अनेक पालक आपली मुलगी पळून गेली किंवा बेपत्ता आहे अशी तक्रारही करीत नाही. तिने आम्हची मान खाली केली ती आता आम्हच्या कुटुंबातील सदस्यांपैकी नाही असे गृहीत धरून ती बेपत्ता झाली किंवा तिचे अपहरण झाले अशी तक्रारही करीत नाही. आॅपरेशन १ मध्ये ५ मुली व आॅपरेशन २ मध्ये २ मुली ज्या मिळाल्या त्या रेकॉर्डवरच नव्हत्या. आॅपरेशन १ मध्ये रेकॉर्डवरील १२ मुली, आॅपरेशन नंतर ७ मुली, आॅपरेशन २ मध्ये आॅपरेशन नंतर २ मुली, आॅपरेशन ३ मध्ये रेकॉर्डवरील १ मुलगी, आॅपरेशन नंतर ३ मुली, आॅपरेशन ४ मध्ये रेकॉर्डवरील ४ मुली, आॅपरेशन नंतर २ मुली, आॅपरेशन ५ मध्ये रेकॉर्डवरील २ मुली, आॅपरेशन नंतर १५ मुली अशा रेकॉर्डवरील ४८ व रेकॉर्ड व्यतीरिक्त ७ आा ५५ मुली घरी आल्या आहेत.परतलेल्या मुलींचे नशीब चांगले होते, की त्यांचे आई-वडील सैराट सिनेमातील नायीकेच्या आई वडीलांसारखे नव्हते. एकदा पळून गेलेल्या मुलींना स्वीकारायला खूप मोठी हिंमत लागते. ती हिंमत गोंदिया जिल्ह्यातील त्या मुलींच्या आई-वडिलांनी दाखविली. आई-वडिलांचा आदर्श मुला-मुलींनी ठेवून त्यांची आब्रू राखावी.-हरिष बैजल पोलीस अधिक्षक गोंदिया.
सैराट झालेल्या ५५ मुली घरी परतल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 9:30 PM
प्रेमाच्या आमिषाला बळी पडलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेकडो मुली सैराट झाल्या होत्या. ज्या तरूणासोबत सुखी संसार करण्याचे स्वप्न त्या मुलींनी रंगविले होते ते स्वप्न पळून गेल्यानंतर काही दिवसांतच धुळीस मिळाले. अखेर प्रेमभंग झालेल्या त्या ५५ मुली गोंदिया पोलिसांच्या मदतीने आपल्या आई-वडिलांकडे परतल्या आहेत.
ठळक मुद्दे७ मुली रेकॉर्डवरच नव्हत्या : ४८ मुली होत्या पोलिसांच्या रेकॉर्डवर