शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

55 हजार शेतकऱ्यांचे 328 कोटी रुपयांचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2022 5:00 AM

मार्केटिंग फेडरेशनने यंदा १०७ धान खरेदी केंद्रावरून १ लाख १७ हजार २६७ शेतकऱ्यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत ३४ लाख ५६ हजार ७४८ क्विंटल धानाची विक्री केली. विक्री केलेल्या धानाची एकूण किमत ६७० कोटी ६० लाख ९१ हजार रुपये असून यापैकी आतापर्यंत ३४१ कोटी ६२ लाख ७७ हजार ५८४ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, तर ३२८ कोटी ९९ लाख रुपयांचे चुकारे थकीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर खरीप हंगामातील धानाची विक्री करणाऱ्या ५५ हजार शेतकऱ्यांचे ३२८ कोटी रुपयांचे धानाचे चुकारे मागील दोन महिन्यांपासून थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. मार्केटिंग फेडरेशनने यंदा १०७ धान खरेदी केंद्रावरून १ लाख १७ हजार २६७ शेतकऱ्यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत ३४ लाख ५६ हजार ७४८ क्विंटल धानाची विक्री केली. विक्री केलेल्या धानाची एकूण किमत ६७० कोटी ६० लाख ९१ हजार रुपये असून यापैकी आतापर्यंत ३४१ कोटी ६२ लाख ७७ हजार ५८४ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, तर ३२८ कोटी ९९ लाख रुपयांचे चुकारे थकीत आहे. चुकाऱ्यांसाठी शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. धानाची विक्री करून शेतकरी उधार उसणवारी व कर्जाची परतफेड करतात. मात्र चुकारे न मिळाल्याने त्यांना आपली गरज भागविण्यासाठी नातेवाईक आणि सावकारांपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे. नैसर्गिक संकटामुळे आधीच शेतकरी त्रस्त असताना त्यांना कृत्रिम संकटांना सुध्दा तोंड द्यावे लागत आहे. 

१६ हजारांवर शेतकरी राहिले वंचित - शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अट शासनाने यावर्षीपासून लागू केली. ७ फेब्रुवारीपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार १९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी आतापर्यंत १ लाख १७ हजार २६७ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. मात्र धान विक्री करण्याची मुदत संपल्याने १६ हजारांवर शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धान विकण्याची वेळ आली आहे.

१८ लाख क्विंटल धान उघड्यावर - जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप हंगामात ३४ लाख ५६ हजार ७४८ क्विंटल धानाची खरेदी केली आहे. यापैकी आतापर्यंत राईस मिसर्लने १९ लाख क्विंटल धानाची उचल केली आहे तर उर्वरित १८ लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर तसाच उघड्यावर पडला आहे. त्यामुळे या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भरडाई व उचल संथगतीने - जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची राईस मिलर्ससह करार करून भरडाई करून तांदूळ शासनाकडे जमा केला जातो; पण शासनाने अद्यापही राईस मिलर्सच्या मागण्यांवर तोडगा काढला नसल्याने त्यांनी धानाची उचल करणे थांबविली आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ ०.५५ टक्केच धानाची भरडाई झाली आहे तर उर्वरित धान तसाच केंद्रावर पडला आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड