लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीपानंतर जिल्ह्यात रब्बी धानाची सुध्दा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. रब्बीतील धान बाजारपेठेत विक्रीस येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय धान खरेदी केंद्र सुरु झाले नव्हते. लोकमतने सोमवारी (दि.१४) ही बातमी प्रकाशीत करताच जिल्हा मार्केटिंग फेडरेशने तातडीने सोमवारी सौंदड येथे एक धान खरेदी केंद्र सुरू केले. तसेच येत्या चार पाच दिवसात उर्वरित ५५ केंद्र सुरू करण्यात येणार आहे.शेतमालाला शासकीय हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी करते. शासनाने यंदा अ दर्जाच्या धानाला प्रती क्विंटल १५५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र अद्यापही रब्बीतील धान खरेदीसाठी खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाºयांकडे जाण्याची पाळी आली होती. यावरुन शेतकºयांमध्ये रोष व्याप्त होता. लोकमतने या संदर्भातील वृत्त प्रकाशीत केल्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशने त्याची दखल घेत सोमवारी सौंदड येथे धान खरेदी केंद्र सुरू केले. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.येत्या आठ दहा दिवसात रब्बी हंगामातील धानाची बाजारपेठेत आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात ५६ धान खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याला या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा दुजोरा दिला.येथे सुरू होणार खरेदी केंद्रजिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यात ५६ धान खरेदी सुरू केले जाणार आहेत. त्यामध्ये गिरोला, कटंगीकला,रतनारा, दासगाव, काटी, अदासी, कामठा, नवेगाव धापेवाडा, रावणवाडी, टेमनी, गोंदिया, मजितपूर, कोचेवाही, आसोली, गोरेगाव, कालीमाटी, तिमेझरी, गणखैरा, कुऱ्हाडी, चोपा, तेढा, दवडीपार, कवलेवाडा, मोहगाव (तिल्ली), चिरेखनी, पाजंरा, वडेगाव, नवेझरी, विहीरगाव, बघोली, भिवापूर, ठाणेगाव, तिरोडा, मुंडीकोटा, चिखली, मेंढा, आमगाव, गोरठा, कालीमाटी, सालेकसा, कोटजांभोरा, पांढरी, सौंदड, मुरपार, ब्राम्हणी, हेटी, धानोरी, अर्जुनी मोर, नवेगावबांध, महागाव, बोंडगावदेवी, वडेगाव (स्टेशन) बाकटी धाबेटेकडी, भिवखिडकी आदी केंद्राचा समावेश आहे.
जिल्ह्यात सुरू होणार ५६ धान खरेदी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 9:50 PM
खरीपानंतर जिल्ह्यात रब्बी धानाची सुध्दा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. रब्बीतील धान बाजारपेठेत विक्रीस येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय धान खरेदी केंद्र सुरु झाले नव्हते.
ठळक मुद्देसौंदड येथे धान खरेदीला सुरुवात : टप्प्याटप्प्याने वाढविणार केंद्र