लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेत जिल्ह्यातील अतिदुर्गम व ग्रामीण क्षेत्रातील ५७ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदेच्यावतीने गौरव करण्यात आला.गुरूवारी (दि.६) आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी होते. शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले, शिक्षणाधिकारी (प्राथ) उल्हास नरड प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. दयानिधी यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधायुक्त दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे याकरिता केंद्र शासनाने जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना १९८६ मध्ये केली. याचा लाभ ग्रामीण क्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, तसेच आपला सर्वांगिण विकास या विद्यालयाच्या माध्यमातून करुन उच्च पदावरती प्रत्येक विद्यार्थी पोहोचला पाहिजे असे प्रतिपादन केले. अंबुले यांनी, यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे कौतुक केले.कार्यक्रमात एकूण पात्र ५७ विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थी हजर होते. यामध्ये क्रिया कुंवरलाल बघेले आणि धनश्री योगराज बिसेन या दोन दिव्यांग विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होता. तसेच आमगाव तालुक्यातील दोन, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एक, देवरी तालुक्यातील एक, गोंदिया तालुक्यातील चार, गोरेगाव तालुक्यातील १३, सालेकसा तालुक्यातील तीन, सडक-अर्जुनी तालुक्यातील सात व तिरोडा तालुक्यातील दोन अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा डॉ. राजा दयानिधी, रमेश अंबुले, उल्हास नरड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गुलाबाचे फुल देवून गौरव करण्यात आला.संचालन विजय ठोकणे यांनी केले. आभार बाळकृष्ण बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी कुलदीपीका बोरकर, दिलीप बघेले, मनोजकुमार शेणमारे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही गावातील सरपंच उपस्थित होते.
५७ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 9:53 PM
केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेत जिल्ह्यातील अतिदुर्गम व ग्रामीण क्षेत्रातील ५७ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदेच्यावतीने गौरव करण्यात आला.
ठळक मुद्देग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची भरारी : जिल्हा परिषदेने केला विद्यार्थ्यांचा गौरव