लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील जवळपास ७७७ मजूर गोंदिया येथे अडकले होते. या मजुरांना त्यांच्या राज्य आणि जिल्ह्यात पोहचविण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. यातंर्गत जिल्ह्यात अडकलेल्या ५७७ मजुरांना एसटी बसेसने गुरूवारी (दि.७) त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले. यामुळे तब्बल ४६ दिवसानंतर या मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर विविध राज्यातील मजूर गोंदियात अडकलेले होते.आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोंदियातून ५७७ नागरिकांना एस.टी. बसेमधून रवानगी करण्यात आली. यापूर्वी सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सोबत जेवण, पाणी देण्यात आले. त्यांच्यासाठी मास्कची व्यवस्था करण्यात आली. या बसेस ज्या ठिकाणी जाणार आहेत त्याच ठिकाणी जाऊन थांबणार असून प्रवासादरम्यान कोठेही थांबणार नाहीत.बुधवारी आणि गुरूवारी मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजनांदगाव, बडोदा बाजार, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा येथील मजुरांना बसेसव्दारे त्यांच्या स्वगृही रवाना करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या त्या राज्य आणि जिल्ह्याची परवानगी घेवून त्यांना रवाना केले जात आहे. गोंदियातून ५७७ नागरिकांना एस.टी.बसेमधून रवानगी करण्यात आली. या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित मजुरांना सुध्दा लवकरच त्यांच्या राज्यात व जिल्ह्यात सोडण्यात येईल.- डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी गोंदिया.
अडकलेले ५७७ मजूर त्यांच्या राज्यात रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 5:00 AM
आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोंदियातून ५७७ नागरिकांना एस.टी. बसेमधून रवानगी करण्यात आली. यापूर्वी सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सोबत जेवण, पाणी देण्यात आले. त्यांच्यासाठी मास्कची व्यवस्था करण्यात आली. या बसेस ज्या ठिकाणी जाणार आहेत त्याच ठिकाणी जाऊन थांबणार असून प्रवासादरम्यान कोठेही थांबणार नाहीत.
ठळक मुद्दे७७७ मजूर होते अडकले : एसटी बसेस सोडण्याची व्यवस्था