लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर १५०० रुपये नक्षलभत्ता व चटई क्षेत्रानुसार अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीसह ५७७ शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात यावा व अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करून थकबाकीसह अदा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील यांना दिले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप तिडके यांनी दिली.गोंदिया जिल्ह्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना दीड हजार रुपये नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळावा, यासाठी १० वर्षांत शेकडो बैठका, धरणे, निवेदने, अनेकवेळा मुंबईची वारी, दोनवेळा नागपूरला सचिवस्तरीय बैठका घेण्यात आल्या. २०१९ मध्ये जिल्ह्यातील ५७७ शिक्षकांच्यावतीने उच्च न्यायालयाचे वकील प्रदीप क्षीरसागर यांच्यातर्फे उच्च न्यायालयात संदीप तिडके, किशोर डोंगरवार, निलकंठ बिसेन व दिलीप लोदी यांच्या नेतृत्वात नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडेभत्ता यासंदर्भात रिट याचिका दाखल करण्यात आली. संबंधित याचिकेच्या अनुषंगाने १३ जानेवारी २०२० रोजी अंतरिम आदेश निर्गमित केला गेला. त्यानुसार, मूळ याचिकेतील ५७७ शिक्षकांना नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करण्याचे आदेश काढण्यात आले. न्यायालयाचा सन्मान ठेवत आदेश काढल्याबद्दल शिक्षक समितीने मुकाअ. पाटील, उपमुकाअ. नरेश भांडारकर, खोटरे, शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे आभार मानले. न्यायालयीन लढ्यासाठी जिल्हा नेते मनोज दीक्षित, एल. यू. खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, सदस्य संदीप तिडके, सरचिटणीस संदीप मेश्राम, कार्याध्यक्ष डी. एच. चौधरी, जि. एम. बैस, पी. आर. पारधी, एन. बी. बिसेन, प्रदीप रंगारी, सुरेश कश्यप, दिलीप लोदी, कैलास हांडगे, मुकेश रहांगडाले, संजय बोपचे, गजानन पाटणकर, रमेश गहाणे, दिनेश उके, सतीश दमाहे, एस. डी. नागपुरे, दिनेश बिसेन, प्रदीप बडोले, गौतम बांते, अशोक बिसेन, अनुप नागपुरे, किरण बिसेन, बिसराम मेंढे, उमेश रहांगडाले, एस. डी. रहांगडाले, शोभेलाल ठाकूर, विनोद बहेकार, बि. एस. केसाळे, महेश कवरे, क्रिश कहालकर, विलास डोंगरे यांनी सहकार्य केले.