लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शनिवारी (दि.२०) येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पातील वन विभागाच्या अखत्यारितील वन जमिनीसाठी ५८ भूधारकांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी आमदार विजय रहांगडाले, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य डॉ.लक्ष्मण भगत, तहसीलदार कल्याणकुमार डहाट प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महेंद्र नंदेश्वर, प्रमोद जनबंधू, नोकलाल सोनवाने, संगीता नेवारे, धोंडू सोनवाने, योगराज ठाकरे, श्रीराम राऊत, जगलाल दिहारे, सुनील शहारे, नरेश नेवारे, पतीराम चौधरी, अनिल नंदेश्वर, भोलाराम भोंडे, पंचशीला शहारे, अशोक चौधरी, दशरथ नाईक, बुधराम सोनवाने यांच्यासह ५८ शेतकºयांना वन विभागाच्या अखत्यारितील १३.६९ हेक्टर वन जमिनीसाठी १६ लक्ष ५९ हजार ७३४ रु पये धनादेश वाटप करण्यात आले.
५८ प्रकल्पग्रस्तांना धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 9:35 PM
पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शनिवारी (दि.२०) येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पातील वन विभागाच्या अखत्यारितील वन जमिनीसाठी ५८ भूधारकांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देकटंगी मध्यम प्रकल्प : तहसील कार्यालयातील कार्यक्रम