नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १० मार्चला लागू करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गोंदिया पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ५१७ पैकी ३३७ बंदुका जमा करण्यात आल्या आहेत.२२ बंदुकांना बँकाच्या संरक्षणासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु ५८ बंदुका अजूनही जमा झाल्या नाहीत.लोकसभेची सार्वत्रीक निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील परवनाधारक बंदूक मालकांना सदर बंदुका पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश तत्काळ देण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी आपापल्या पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बंदूक परवानाधारकांना वेळीच सूचना देऊन त्या बंदुका संबधित पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात १८७ लोकांनी आत्मसंरक्षणासाठी बंदुका घेतल्या आहेत. तर ३३० जणांनी पीक संरक्षणासाठी बंदुका घेतल्या आहेत. अशा एकूण ५१७ बंदुका लोकांना देण्यात आल्या आहेत. आत्मसंरक्षणासाठी असलेल्या १८७ पैकी ११२ बंदुका आपापल्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. तर ७५ बंदुका अजूनही बोहर आहेत. पीक संरक्षणासाठी ३३० बंदुका देण्यात आल्या आहेत. यापैकी ३२५ बंदुका जमा करण्यात आल्या आहेत. यातील पाच बंदुका अद्याप जमा झाल्या नाहीत.आचारसंहितेचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, आचार संहितेचा भंग होणार नाही याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. परंतु आचारसंहिता लागून २४ तास उलटले तरी जिल्ह्यातील ८० बंदुका बाहेरच असल्याचे वास्तव पुढे आले आहेत. परंतु या ८० बंदुकांपैकी २२ बंदुका जिल्ह्यातील बँकाच्या संरक्षणासाठी देणे आवश्यक आहेत. त्या २२ बंदुका वगळता अद्यापही ५८ बंदुका बाहेरच असल्याची माहिती आहे. जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ह्या बाहेर असलेल्या बंदुका त्वरीत पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक आहेत. सर्व परवानाधारक बंदुकधाऱ्यांनी ह्या बंदुका संबधीत पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिल्यानंतरही त्या बंदुका जमा करण्यात हलगर्जी का होत आहे याकडे पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक आहे.पोलीस विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आकडेवारीत तफावतगोंदिया जिल्ह्यातील किती लोकांना बंदुकीचे परवाने देण्यात आले आहेत. याचा आढावा घेतला असता जिल्हाधिकारी कार्यालयाने आत्मसंरक्षणासाठी १४२ तर पीक संरक्षणासाठी ४३० बंदुका असल्याचे सांगते. परंतु हीच माहिती जिल्हा पोलिसांकडून घेतली असता आत्मसंरक्षणासाठी १८७ तर पीक संरक्षणासाठी ३३० बंदुका असल्याचे सांगते. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीपेक्षा पोलिसांच्या आकडेवारीत पीक संरक्षणाच्या १०० बंदुका कमी आहेत. तर आत्मसंरक्षणाच्या ४५ बंदुका वाढल्या आहेत.आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार का?आदर्श आचार संहितेचे तंतोतंत पालन करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाºयांनी सजग राहणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाºयांनी सोमवारी (दि.११) आदेश काढून बंदुका त्वरीत जमा करण्याचे आदेश दिले. या आदेशाची तामील पोलीस विभागाने केली. आचार संहिता लागण्याच्या पूर्वी पासून पोलीस विभागाने आपापल्या पोलीस ठाण्यांना सूचना केल्या होत्या. त्यामुळे ४३७ बंदुका जमा झाल्या आहेत. उर्वरीत बंदुका जमा करण्यासाठी पोलीस विभागाने त्वरीत कारवाई करणे अपेक्षीत आहे.
५८ बंदुका जमाच झाल्या नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:00 PM
लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १० मार्चला लागू करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गोंदिया पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ५१७ पैकी ३३७ बंदुका जमा करण्यात आल्या आहेत.२२ बंदुकांना बँकाच्या संरक्षणासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु ५८ बंदुका अजूनही जमा झाल्या नाहीत.
ठळक मुद्दे२२ बंदुकांना सूट : ४३७ बंदुका जमा, दोन विभागांच्या माहितीत तफावत