शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

५८ हजार शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अनुदानाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 4:55 PM

पीएम किसान सन्मान निधी : १८ व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. आतापर्यंत या योजनेचे १७वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. पण, जिल्ह्यातील तब्बल ५८ हजार शेतकऱ्यांना १७ व्या हप्ताचे अनुदान अद्याप मिळालेले नाही, तर आता लवकरच १८ वा हप्ता जमा केला जाणार असून, तो सुद्धा मिळणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे. 

 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करताना शेतकऱ्यांनी नोंदणीच्या वेळी दिलेले मोबाइल क्रमांक चुकीचे असल्याचे आढळून आले आहेत. मोबाइल क्रमांक दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. आता त्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे योजनेचे पैसे लटकण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपला मोबाइल क्रमांक बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे. कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरण करणेही गरजेचे आहे. तेव्हाच यापुढील पीएम किसान सन्मान निधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ४१४ शेतकऱ्यांच्या खात्यात १७ व्या हप्त्याचे अनुदान जमा करण्यात आले होते. परंतु, विविध कारणांमुळे ५८ हजार २६० शेतकऱ्यांच्या हप्त्याची रक्कम अडकली आहे. जिल्ह्यात १ लाख ६४ हजार ६७४ शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभासाठी पात्र आहेत. यापैकी ९३५ शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही. हे शेतकरी निधीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 

३० हजार शेतकऱ्यांनी बदलला मोबाइल क्रमांक जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांनी मोबाइल क्रमांक बदलला आहे. २८ हजार शेतकऱ्यांच्या सातबाराचा क्रमांक जुळत नसल्याने त्यांना १७ वा हप्ता त्यांच्या बँक खात्यावर अद्यापही जमा करण्यात आला नसल्याची माहिती आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये मोबाइल क्रमांक दुरुस्तीसाठी जनजागृती केली जात आहे. परंतु, याबाबत बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नसल्याने त्या शेतकऱ्यांचे मोबाइल क्रमांक बदलायचे बाकी आहेत.

घरबसल्या करा मोबाइल क्रमांक अपडेट शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाइटवर क्लिक करावे. त्यात उजव्या बाजूला फार्मर कॉर्नरमध्ये अपडेट मोबाइल नंबरवर क्लीक करावे. अपडेट मोबाइल नंबर ही विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर किवा आधार क्रमांक टाकल्यानंतर नंबर अपडेट होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

"पीएम किसान योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे मोबाइल क्रमांक चुकले आहे, त्यांच्यापर्यंत पोहचून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे." - अजित आडसुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :gondiya-acगोंदिया