शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

जिल्ह्याला हवेत पीक कर्जासाठी ६० कोटी

By admin | Published: June 15, 2017 12:18 AM

कर्जाचे डोंगर घेऊन उभा असलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने अल्प व मध्यम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली.

३२९ संस्थांमार्फत कर्ज वाटप : कर्जाशिवाय शेती करताच येत नाही लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कर्जाचे डोंगर घेऊन उभा असलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने अल्प व मध्यम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. परंतु त्या शेतकऱ्यांना पुढच्या वर्षाची शेती करण्यासाठी पैश्याची गरज असल्याने पीक कर्जाची मागणी होत आहे. दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉ-आॅपरेटीव्ह बैंकेच्या कार्य क्षेत्रांतर्गत ३२९ प्राथमिक कृषि सहकारी संस्था आहेत. या संस्थाच्या नविन सभासदांना पीक कर्ज घेण्याची गरज भासली आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६० कोटी रूपयाची गरज आहे. आजघडीला शेती परवडणारी नाही. शेतकऱ्यांना कर्जातून सावरण्यासाठी मागील दिड वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ५१ हजार ५४२ शेतकऱ्यांना विविध प्राथमिक कृषि सहकारी संस्थांमार्फत १८३ कोटी ६४ लाख ६७ हजार रूपयाचे कर्ज वाटण्यात आले. ४८ हजार ३३५ लघु व मध्यम भूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉ-आॅपरेटिव बैंक के मुख्य कार्यकारी अधिकारी विलास वासनिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१६-१७ च्या खरीप व रबी पिकासाठी सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना १४० कोटी ५५ लाख रूपये कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट्ये ठेवण्यात आले होते. या वर्षात ३२९ विविध प्राथमिक कृषि सहकारी संस्थांद्वारे ३३ हजार १५३ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ७८२ हेक्टर खरीप व रबी पिकासाठी ११२ कोटी ८८ लाख २२ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. खरीपासाठी ३२८ संस्थांमार्फत ३२ हजार ६१० शेतकऱ्यांना ३४ हजार २१९ हेक्टर पीकांसाठी १११ कोटी ६ लाख ७२ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. तर रबी पिकासाठी २२ संस्थांमार्फत ५४३ शेतकऱ्यांना ५६३ हेक्टरसाठी एक कोटी ८ लाख १५ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. सन २०१७-१८ मध्ये खरीपपिकासाठी १०५ कोटी ५७ लाख रूपये कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट्ये ठेवण्यात आले. यात २ जून २०१७ पर्यंत २९६ संस्थामार्फत १८ हजार ३८९ शेतकऱ्यांना १९ हजार ९९२ हेक्टर पीकासाठी ७० कोटी ७६ लाख ४५ हजार रूपये म्हणजेच ६७.०३ टक्के कर्ज वाटप करण्यात आले. रबी पिकासाठी ९ कोटी ४३ लाखाचे उद्दीष्ट्ये ठेवण्यात आले आहे. ३२०७ मोठ्या शेतकऱ्यांना ३२ कोटींचे कर्ज वाटप विविध प्राथमिक कृषि सहकारी संस्थांद्वारे सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये २ जून पर्यंत ३ हजार २०७ मोठ्या शेतकऱ्यांना ९ हजार ७४६ पीकासाठी ३२ कोटी ६८ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. या काळात ४८ हजार ३३५ लघु व मध्यम शेतकऱ्यांना ४५ हजार २८ हेक्टर पीकांवर १५१ कोटी ६३ लाख ९९ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. सन २०१६-१७ मध्ये ३२९ संस्थाद्वारे ३१ हजार २३३ शेतकऱ्यांना रबी व खरीपाच्या २८ हजार ७८२ हेक्टर पीकासाठी ९३ कोटी ६४ लाख ६४ हजार रूपये व सन २०१७-१८ मध्ये २ जून पर्यंत २९६ संस्थाद्वारे १७ हजार १०२ शेतकऱ्यांच्या १६ हजार २४६ हेक्टर खरीप पिकासाठी ५७ कोटी ९९ लाख ३५ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आला आहे.