शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

गतवर्षीची ६० हजार रोपटी ‘खल्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 9:30 PM

महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी ४ कोटी वृक्ष लागवड योजना राबविली. या योजनेत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींनी २ लाख २१ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील ५९ हजार ३९१ रोपटी जिवंत नसल्याची कबुली स्वत: ग्रामपंचायतींनी दिली आहे.

ठळक मुद्दे५४५ ग्रामपंचायतींचे काम : ७३ टक्के रोपटी जगविण्यात पास

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी ४ कोटी वृक्ष लागवड योजना राबविली. या योजनेत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींनी २ लाख २१ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील ५९ हजार ३९१ रोपटी जिवंत नसल्याची कबुली स्वत: ग्रामपंचायतींनी दिली आहे. म्हणजेच लावलेल्या रोपट्यांपैकी २७ टक्के रोपटी ‘खल्लास’ झाली आहेत.वृक्षारोपणासह त्यांचे संगोपन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु वृक्षारोपण करून निसर्गावर सोडून देण्यात आल्यामुळे सन २०१७ मध्ये लावलेल्या रोपट्यांपैकी ५९ हजार ३९१ रोपटी मेली आहेत.यात, आमगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतने २५ हजार ६०० रोपटी लावली होती. त्यातील १६ हजार ६४० रोपटी जिवंत असून ८ हजार ९६० रोपटी मेली असून जीवित रोपट्यांची टक्केवारी ६५ एवढी आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींनी २८ हजार रोपटी लावली होती. यातील १९ हजार १८० रोपटी जिवंत असून ८ हजार ८२० रोपटी मेली असून जिवंत रोपट्यांची टक्केवारी ६८ एवढी आहे.देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी २२ हजार रोपटी लावली होती. त्यातील १८ हजार ५६९ रोपटी जिवंत असून ३ हजार ४३१ रोपटी मेली व जीवित रोपट्यांची टक्केवारी ८४ एवढी आहे.गोंदिया तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींनी ४३ हजार ६०० रोपटी लावली होती. त्यातील ३३ हजार १०३ रोपटी जिवंत असून १० हजार ४९७ रोपटी मेली व जीवंत रोपट्यांची टक्केवारी ८९ एवढी आहे. गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी २२ हजार रोपटी लावली होती.त्यातील १५ हजार ८८५ रोपटी जिवंत असून ६ हजार ११५ रोपटी मेली व जिवंत रोपट्यांची टक्केवारी ७२ एवढी आहे. सालेकसा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींनी १६ हजार ८०० रोपटी लावली होती. त्यातील ११ हजार ९२८ रोपटी जिवंत असून त्याचे प्रमाण ७१ टक्के एवढे आहे. ४ हजार ८७२ रोपटी मेली. सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींनी २५ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील १८ हजार १४४ रोपटी जिवंत असून ७ हजार ५६ रोपटी मेली व जीवित रोपट्यांची टक्केवारी ७२ एवढी आहे.तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचातींनी ३८ हजार रोपटी लावली होती. त्यातील २८ हजार ३६० रोपटी जिवंत असून ९ हजार ६४० रोपटी मेली व जिवंत रोपट्यांची टक्केवारी ७५ एवढी आहे.म्हणजेच जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५४५ ग्रामपंचातींनी २ लाख २१ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील १ लाख ६१ हजार १८० रोपटी जिवंत असून ८ हजार ८०९ रोपटी मेली असून जीवित रोपट्यांचे प्रमाण ७३ टक्के आहे.एकीकडे वृक्षारोपणासाठी शासनाकडून जोर दिला जात असून विविध योजना राबविल्या जात आहेत. तर दुसरीकडे मात्र संवर्धनाकडे दुर्लक्ष असल्यामुळे लावलेली झाडे लोप पावत आहेत.२७ टक्के रोपटी मेलीगोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणाच्या कामात चांगले सहकार्य केले. या कामात सर्वात जास्त हलगर्जी आमगाव तालुक्यात झाला आहे. आमगाव तालुक्यात लावलेली ३५ टक्के रोपटी मेली आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३२ टक्के, देवरी तालुक्यातील १६ टक्के, गोंदिया तालुक्यातील ११ टक्के, गोरेगाव तालुक्यातील २८ टक्के, सालेकसा तालुक्यातील २९ टक्के, सडक-अर्जुनी तालुक्यातील २८ टक्के, तिरोडा तालुक्यातील २५ टक्के रोपटी मेली. जिल्ह्याची टक्केवारी बघितली असता २७ टक्के रोपटी जगू शकली नाहीत.अनेक ठिकाणी एकाच खड्ड्यात वृक्षारोपणग्रामपंचायतच्या माध्यमातून दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्षारोपण होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. शासनाने असे घडू नये म्हणून प्रत्येक खड्ड्यावर सेटेलाईटच्या माध्यमातून नजर असेल व तसे नियंत्रण ठेवले जाईल म्हटले होते. परंतु तसे होताना दिसत नाही. वृक्षलागवड ज्या झपाट्याने होते, त्याच झपाट्याने त्या रोपट्यांच्या संवर्धनासाठी जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग