आॅनलाईन लोकमतगोंदिया : १ मार्च २०१८ ते ६ मार्च २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुका २५ फेब्रुवारी रोजी होत आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत आहे. गोंदिया तालुक्यातील माकडी ग्रामपंचायतीची सामान्य निवडणूक व इतर ६० ग्रामपंचायतीचा पोट निवडणुका होणार आहेत.गोंदिया तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून एक सरपंचाची निवडणूक तर १८ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. गोरेगाव तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून ४ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.तिरोडा तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून १० सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून एक सरपंचाची निवडणूक तर १६ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. देवरी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून दोन सरपंचाची निवडणूक तर २५ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. आमगाव तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून ४ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. सालेकसा तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून एक सरपंचाची निवडणूक तर १६ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून १८ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. एकूण ६१ ग्रामपंचायतीत १११ सदस्य व पाच सरपंचाची निवडणूक होत आहे. या निवडणूक संदर्भात नामनिर्देशन अर्जांची छाननी आज करण्यात आली. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख १५ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत. त्याचवेळी निवडणुक चिन्ह देण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी २६ फेब्रुवारी रोजी व २७ फेब्रुवारी रोजी निवडणुकाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ६१ ग्रा.पं.च्या निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:01 AM
१ मार्च २०१८ ते ६ मार्च २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुका २५ फेब्रुवारी रोजी होत आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत आहे.
ठळक मुद्देपाच ठिकाणी सरपंचाची निवड : १११ सदस्यांसाठी होणार निवडणूक