गोंदिया : जिल्हा पोलीस विभागातील शिपाई पदाच्या ४० जागांसाठी २९ मार्च पासून भरती प्रक्रीया सुरू झाली आहे. या भरतीसाठी ४४९३ पुरूष व १६३५ महिला असे एकूण ६१२८ आॅनलाईन अर्ज आले आहेत. पोलीस शिपाई पदाच्या भरती करिता कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीसाठी दिनांक २९ मार्च पासून दररोज ५०० ते ८०० उमेदवारांना पोलीस मुख्यालयात बोलाविण्यात आले आहे. सदर पोलीस भरती पारदर्शक घेण्यासाठी सीसीटिव्ही तसेच व्हीडिओ चित्रण करण्यात येत आहे. उमेदवारांना पिण्याचे पाणी, केळी व ग्लुकोज पावडर मोफत पुरविण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक शशिकुमार मिना यांनी सदर भरती प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे सांगून कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भरती प्रक्रियेकरिता पोलीस अधिक्षक मिना, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले, परि. सहायक पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, पोलीस उप अधिक्षक (गृह) सुरेश भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर, दिपाली खन्ना, परि. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी -कर्मचारी व लिपीकवर्गीय कर्मचारी कार्यरत आहेत.(शहर प्रतिनिधी)
६१२८ उमेदवारांचे अर्ज
By admin | Published: April 04, 2016 5:09 AM